Coronavirus : इंदोरमधील डॉक्टरांवरील हल्ल्याचा बॉलिवूडकडून तीव्र ‘निषेध’ ! ‘बिग बीं’नी समर्पित केलं ‘कुली’मधील गाणं

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोना व्हायरस पॅनडेमिकमध्ये मेडिकल स्टाफ महत्त्वाची भूमिका साकारत आहे. जनता कर्फ्युच्या दिवशी पीएम मोदींनी टाळी आणि थाळी वाजवण्या आवाहन केलं होतं. अशातच इंदोरमधून मेडिकल स्टाफवर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती ज्यामुळं साऱ्यांनाच धक्का बसला होता. बॉलिवूडनंही याचा निषेध केला आहे. सोशल मीडियावर ट्विट करत कलाकरांनी आपलं म्हणणं मांडलं आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक ग्राफीक्स शेअर केले आहे. यात मेडिकल स्टाफ ग्लोब उचलताना दिसत आहे. त्यांनी लिहिलं की, सारी दुनिया बोझ हम उठाते है. कुलीमधील माझं गाणं.

बिग बी यांनी आणखी एका ट्विटमध्ये घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता.

ऋषी कपूर यांनी लिहिलं की, “सर्व वर्गातील बंधु आणि भगिनींना विनंती आहे की, त्यांनी दगडफेक आणि सामूहिक हिंसाचारापासून दूर रहावं. डॉक्टर्स, नर्स, पोलीस असे सर्वजण कोरोनाशी लढताना जीव धोक्यात घालत आहेत. आपल्याला ही लढाई जिंकायची आहे.”

हेमा मालिनी म्हणतात, “अशा प्रकारे डॉक्टरांवर कसं कोणी हल्ला करू शकतं. जे आपल्याला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालत आहे. दु:दायक आणि त्रासदायक आहे हे.”

शबाना आझमी यांनी ट्विट करत आपल्या भावना मांडल्या आहेत.