मुंबईत ‘कोरोना’चे 2749 नवे पॉझिटिव्ह, 1305 इमारतींना सील; बंधनात तब्बल 71 हजार कुटूंब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या नव्या 2749 जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर याची गंभीर दखल बृहन्मुंबई महानगरपालिकेने 1305 इमारती सील केल्या आहेत. तसेच या इमारतींमध्ये सुमारे 71,838 कुटुंब राहत आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर बंदी असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह इतर काही जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, राज्यात 45,956 ऍक्टिव्ह केसेस आहेत. तर 19,89,963 जण बरे झाले आहेत. तर या कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याने 51,713 जणांचा मृत्यू झाला. वृत्तसंस्था ANI ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मार्च 2020 पासून 19 फेब्रुवारी 2021 दरम्यान कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या आणि मास्क न घालणाऱ्यांकडून 31 कोटी 79 लाख 43 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सार्वजनिक ठिकाणांवर मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानुसार, 15 लाख 71 हजार 679 लोकांना दंड आकारण्यात आला.

1305 इमारती सील
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सर्वाधिक रुग्ण आढळल्यास इमारती सील करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करत 1305 इमारती सील करण्यात आल्या आहेत.