ताप न येताही वृद्धांना होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग; कसं ओळखायचं संक्रमण? नव्या संशोधनानुसार झालं स्पष्ट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वेगाने संक्रमित होत आहे. यामध्ये कोणत्या व्यक्तीला ताप आला की म्हणजे कोरोनाची लागण झाली असल्याचं समजलं जाते. हा पॅटर्न तरुण पिढीमध्ये काही प्रमाणात खरा ठरलाय. तर वृद्धांच्या संदर्भात काही वेगळाच अहवाल पुढं आलाय. वृद्धांना कोरोनाची लागण झाली तर त्यांना ताप येणे गरजेचे नाही, तर संसर्ग ओळखण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरद्वारे सतत त्यांचे ऑक्सिजन लेव्हल तपासले पाहिजे.

अमेरिकेच्या वाशिंग्टन राज्य विद्यापीठाच्या नव्या संशोधनानुसार अशी माहिती समोर आली आहे. वृद्ध व्यक्तींच्या शरीराचं तापमान तपासण्याऐवजी पल्स ऑक्सिमीटरचा वापर अधिक फायदेशीर होत आहे. आणि हा अहवाल मेडिकल जर्नल फ्रंटियर्स इन मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला आहे. याला वॉश्गिंटन स्टेट युनिवर्सिटीचे कॅथरिन वान सोन आणि डेबोरा इती यांनी बनविला आहे. तर फक्त ताप येणे हे लक्षण न मानता निरीक्षण केल्याने त्या वृद्धाला काही समस्या नसतात. मात्र, घरातील इतर सदस्यही कोरोनाच्या विळख्यात सापडू शकतात. कोरोना असलेल्या वृद्धांमध्ये ताप नसला तरी थकवा, अंगदुखी, वास घेण्याची क्षमता कमी होणे असे लक्षणे असतात. असे असल्यास त्यांच्यात ऑक्सिजनची लेव्हल आहे की नाही हे तपासणे. नाहीतर RTPCR टेस्टने कोरोना झाला कि नाही याची खात्री करता येते.

रिडिंगवर ‘या’ गोष्टीचा परिणाम होऊ शकतो..
१. कमकुवत रक्ताभिसरण
२. त्वचेची जाडी
३. तंबाखूचा वापर
४. शरीरातील त्वचेवर डाग असणे
५. बोटावर शाई किंवा नेल पॉलिश असणे
६. त्वचेचे तापमान

ऑक्सिमीटर लावताना ‘ही’ काळजी घ्या…
१. ऑक्सिमीटरवर बोट ठेवताना हात आरामात ठेवा.
२. ज्यांच्या बोटावर नेलपॉलिस असेल ती प्रथम काढा आणि ऑक्सिमीटरमध्ये बोट ठेवा.
३. ऑक्सिजन लेव्हल वारंवार तपासा आणि त्यांची नोंद ठेऊन बदल समजून घ्या.
४. रिडिंग स्थिर होईपर्यंत ऑक्सिमीटर काढू नका.