Coronavirus : बुट अन् चप्पलांमुळं होऊ शकतं ‘कोरोना’चं संक्रमण ? जाणून घ्या काय सांगते WHO

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरुच असून आतापर्यंत ३ कोटी ४२ हजार २९९ जणांना याची बाधा झाली आहे. तर तब्बल ९ लाख ४५ हजार १६४ जणांचा मृत्यू या संसर्गामुळे झाला आहे. हा संसर्ग कसा पसरतो याबाबत जागतिक आरोग्य संघटना (WHO), काही प्रयोगशाळा, शास्त्रज्ञ, डॉक्टर्स नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत. कपडे, धातू किंवा इतर गोष्टींमार्फत याचा प्रसार होऊ शकतो, हे माहिती झाल्यावर आता एक प्रश्न पडतो आहे की, चप्पल किंवा बूट यांच्याद्वारे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का ? यावरती डब्लूएचओने स्पष्टीकरण दिलं आहे.

यासंदर्भात डब्लूएचओने सांगतिले की, चप्पल आणि बूट अशा पादत्राणांद्वारे कोरोनाची बाधा होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. पण डब्लूएचओच्या मतानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून, विशेषतः ज्या घरात लहान मुले जमिनीवर रांगतात किंवा खेळतात अशा ठिकाणी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरच आपले शूज किंवा चप्पल काढावे. अशा गोष्टी घरात आणू नये. त्यामुळे लहान मुलांचा धुळीशी किंवा कोणत्याही घाणीशी कमी संपर्क होईल.

तसेच यापूर्वी सुद्धा जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलं आहे की, वृत्तपत्र किंवा हवेमार्फत कोरोनाचा प्रसार होतात नाही. डब्लूएचओने कोविड-१९ साथीला ११ मार्च २०२० रोजी जागतिक महामारी म्हणून घोषित केलं आहे. सतत हात धुणे व मास्कचा वापरामुळे हा संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात आणता येईल, मात्र त्यासाठी मास्क सैल बंधू नका, मास्क लावताना तोंड आणि नाक व्यवस्थित झाकलेले असायला हवे, असे डब्लूएचओने म्हंटले. सार्वजनिक आरोग्य संस्था, डॉक्टर्स, आणि जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हा ‘Touch Fest’ अर्थात ‘स्पर्शोत्सव’ धोकायदायक असल्याचे सांगितले.