Coronavirus vaccine : व्हॅक्सीन घेण्यापूर्वी किंवा एक डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तर करावे? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसला लगाम घालण्यासाठी व्हॅक्सीनला आवश्यक शस्त्र मानले जात आहे. 1 मेपासून भारतात 18 वर्षावरील लोकांना व्हॅक्सीन दिली जाणार आहे. मात्र लोकांच्या मनात व्हॅक्सीन घेण्यापूर्वी लक्षण दिसल्यास काय करावे, किंवा जर व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तर काय करावे, हेल्थ एक्सपर्टकडून जाणून घेवूयात अशाच काही प्रश्नांची उत्तरे…

अमेरिकेच्या जॉन्स हापकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीमध्ये संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉक्टर अमेश अदलजा यांनी सांगितले की, कोविड-19 होणे किंवा याचे लक्षण दिसल्यास आपले व्हॅक्सीन अपाईमेंट रद्द करावे. कारण तुम्ही सेंटरवर गेल्यास आणखी लोक संक्रमित होऊ शकतात. कोरोनातून पूर्ण बरे झाल्यानंतरच व्यक्तीला लस दिली जाते.

दोन डोस दरम्यान संसर्ग झाल्यास काय करावे –

अनेक लोक व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतर संक्रमित होतात. अशावेळी दुसर्‍या डोसची तारीख 3-4 आठवड्यासाठी पुढे ढकला. याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या नव्या स्टडीनुसार कोविडमधून बरे झालेल्या रूग्णाने किमान तीन महिन्यानंतर व्हॅक्सीन घ्यावी.

व्हॅक्सीन घेण्यापूर्वी औषधाबाबत सावधान –

जर तुमची काही मेडिकल कंडीशन आहे किंवा अगोदरपासून एखादे औषध सुरू असेल तर कोविड व्हॅक्सीनेशन दरम्यान ते थांबवू नका. मात्र, डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

पेन किलर –

कोणत्याही साईड इफेक्टपासून वाचण्यासाठी व्हॅक्सीन घेण्यापूर्वी पेन किलर खाऊ नका. यामुळे व्हॅक्सीनच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

हेल्थ एक्सपर्टचा सल्ला घ्या –

हेल्थ एक्सपर्ट कोणत्याही प्रकारच्या अ‍ॅलर्जीपासून वाचण्यासाठी व्हॅक्सीन घेण्यापूर्वीच अँटीहिसटामाईन औषध घेण्यास मनाई करतात. व्हॅक्सीन घेण्यापूर्वी 15-30 मिनिटांपर्यंत व्हॅक्सीनेशन सेंटरवर थांबा आणि पहा की काही गंभीर साईड इफेक्ट तर होता नाही ना. असे झाल्यास डॉक्टरांशी ताबडतोब संपर्क साधा.

गंभीर साईड इफेक्ट –

कोरोना व्हायरस लसीचे गंभीर साईड इफेक्ट खुप कमी आहेत. खाज, बेशुद्धी, उलटी होणे, अ‍ॅलर्जी रिअ‍ॅक्टशन श्वास घेण्यास त्रास होेणे यांची गंभीर लक्षणे आहेत. जर असे कोणतेही लक्षण जाणवले तर हेल्थ केयर वर्करला ताबडतोब माहिती द्या.