Coronavirus : सावधान ! बँकेच्या EMI सवलतीसाठी कोणालाही देऊ नका OTP, पोलिसांचं आवाहन

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी, मजूर यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते तीन महिने पुढे ढकलण्याचे आवाहन आरबीआयने बँकांना केले आहे. मात्र, या कालावधीत हप्त्याचे व्याज वसूल केले जात आहे. अनेक खासगी बँका आणि फायनान्स कंपन्यांनी कर्जाचे हप्ते वसुलीचं काम सुरुच ठेवले आहे. तर काहींनी आपल्या ग्राहकांना कर्ज हप्त्यात आरबीआयच्या सल्ल्यानुसार सवलत दिली आहे. मात्र, यावरून अनेकांची फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सध्या आरबीयाने जाहीर केलेल्या योजनेत व्याज आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे केवळ पत गुणांकन खराब होऊ नये एवढाच दिलासा नागरिकांना, कर्जदारांना मिळणार आहे. कोरोनामुळे व्यवहार ठप्प असल्याने नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा देण्याची गरज आहे. मात्र, या योजनेमुळे तो दिलासा मिळत नाही. शेतकरी, मजूर यांना दिलासा मिळावा यासाठी एक हजार ते एक कोटीपर्यंतचे जे कर्ज आहेत. त्या कर्जाची परतफेड करताना हे तीन महिने व्याजावर ही सवलत द्यावी अशी मागणी मनसेने केली आहे.

तर दुसरीकडे नागरिकांना हप्त्यात सवलत मिळाल्याने हप्ता माफ करण्यासाठी नागरिकांची काही समाजकंटका कडून फसवणूक करण्यात येत आहे. तुमचे कर्ज माफ होण्यासाठी ओटीपी नंबर सांगा, असे म्हणत ओटीपी नंबर घेऊन नागरिकांच्या खात्यामधून रक्कम काढून घेतली जात आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ट्विटरवरून नागरिकांना आवाहन केले आहे. कृपया कोणत्याही व्यक्तींना किंवा दुव्यावर ओटीपी शेअर करू नका. तसेच इतर कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका. असे ट्विट पोलिसांनी केले आहे. त्यामुळे केवळ पिंपरी-चिंचवडच नाही तर देशातील, राज्यातील सर्वच नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like