Coronavirus : देशात संक्रमण रोखण्यामध्ये आव्हान बनतंय ‘फॉल्स निगेटिव्ह’चं, ‘हे’ आहे कारण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाची भिती वाढत चालली आहे. या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डॉक्टरांना रुग्णांबाबत चिंता वाढली आहे. याचे कारण म्हणजे कोरोनाचे लक्षात न येणारे लक्षण. नुकतेच मुंबईमध्ये एका डॉक्टरला खोकला आणि ताप होता. जेव्हा त्यांनी कोरोनाची तपासणी बीएमसीच्या रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत केली. त्यांचा अहवाल नकारात्मक आला. तेव्हा त्यांना समाधान वाटले मात्र, त्यांचा हा खोकला आणि ताप तसाच राहिला म्हणून त्यांनी पुन्हा एकदा तपासणी केली असता अहवाल सकारात्मक आला. अशी भयानक प्रकरणे देशातील पुणे, नोएडासारख्या शहरात घडत आहे.

हायरिस्क ग्रुपची तपासणी करण्यात विशेष काळजी घ्या
तज्ञ असेही म्हणतात की, फक्त नकारात्मक चाचणीचा अहवाल हे सिद्ध करत नाही त्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला नाही. जर त्या व्यक्तीची लक्षणे दिसत असेल तर त्यासाठी पुर्ण तपासणी करणे आवश्यक आहे. विशेषतः त्या लोकांना ज्यांना हायरिस्क ग्रुप श्रेणीमध्ये ठेवले आहे, जसे की वृद्ध लोक, मधुमेहाचे रुग्ण, हायपर टेन्शन, मूत्रपिंड किंवा हृदयरोगाने ग्रस्त असलेल्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

कारण सर्व चाचण्या 100 टक्के सकारात्मक आल्या तर आपण असे म्हणू शकत नाही की त्या व्यक्तीमध्ये व्हायरस नाही. याचे कारण असे आहे की, अत्यंत संवेदनशील अनुवांशिक घटकांच्या उपस्थितीच्या आधारे व्हायरस अस्तित्वात आहे किंवा नाही याबद्दल त्यांनी अहवाल दिला आहे. येल युनिव्हर्सिटीच्या मेडिसिनचे प्रोफेसर डॉ. हार्लन एम. क्रॅमहोलझ यांच्या म्हणण्यानुसार, संसर्ग होण्याच्या अगदी सुरुवातीच्या वेळेस, नमुने घेण्याच्या वेळी केवळ असे अनुवांशिक घटक आढळू शकतात जे तपासणीचे योग्य निकाल देतील.

महाराष्ट्रात संसर्ग रोखण्यासाठी समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे यांनी असा दावा केला आहे की, सध्या व्हायरस स्क्रीनिंगद्वारे नवीन शिकायला मिळत आहे. मर्यादित डेटामुळे आमच्याकडे जितके नकारात्मक प्रकरणे येत आहे त्या सर्व प्रकरणांचा मजबूत अहवाल आमच्याकडे असावा.

अनेकवेळा नमुन्याची योग्यप्रकारे तपासणी न केल्यास बर्‍याच वेळा निकाल नकारात येऊ शकतात. कधीकधी असे घडते की, संक्रमित व्यक्तीकडून स्वॅबचा नमुना घेण्यात चूक होते. दुसरीकडे, विषाणू फुफ्फुसात असल्यास, नाकातून घेतलेल्या नमुन्यात तो सापडला नसण्याची शक्यता खूपच जास्त असते.