Coronavirus : सर्वात पॉवरफुल ‘हा’ देश कोरोनाच्या दहशतीखाली, एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानला जाणारा देश देखील कोरोनासमोर हातबल झाला आहे. 19 मार्चला म्हणजेच गुरुवारी अमेरिकेत कोरोनाचे एकूण 10,491 प्रकरण समोर आली. जी याआधी 3404 होती. मृतांची संख्या एक दिवसात तब्बल 3 पट वाढली आहे. अमेरिकेत मृतांची संख्या 53 होती जी 19 मार्चला 150 झाली आहे.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रीवेंशन (CDC) कडून सांगण्यात आले की आरोग्य विभाग हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की मृत आणि संक्रमित लोकांच्या संख्येत इतकी वाढ अचानक झाली तरी कशी.

यापूर्वी डोनाल्ड ट्रॅम्प यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन केले होते की कोरोनाग्रस्तांचा उपचार चांगल्या पद्धतीने करा जेणे करुन इतका वेळ मिळावा की त्यावर आपल्याला औषध मिळवता येईल, जे अद्यापही प्रयोगशाळेत आहेत. अमेरिकेच्या 50 राज्यात CDC चे सेंटर आहेत. येथून त्यांना रुग्णांची आकडेवारी कळत आहे. या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

10,491 रुग्णांपैकी 9,842 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 310 लोकांची परिस्थिती गंभीर आहे, तर 290 पेक्षा जास्त लोक प्रवाशांमुळे संक्रमित झाले आहेत. हे सर्व कोरोना संक्रमित लोक सीडीसीच्या नजरेत आहेत.

अमेरिकेत 19 मार्चलाच मलेरियाच्या औषधांद्वारे कोरोनावर उपचार करण्यास मंजुरी देण्यात आली होती. चीनमधून पसरलेल्या कोरोनाने आता जगभरात प्रकोप केला आहे.

अद्यापही कोरोनावर उपचार करता येणारे औषध मिळालेले नाही. अमेरिकेत कोरोनाच्या उपचारासाठी मलेरियाच्या औषधांचा वापर केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की हायड्रोक्सीक्लोरिक्विन नावाच्या एका मलेरियाच्या औषधाने कोरोनावर परिणामकारक उपचार होत आहे. ते म्हणाले हे औषध परिणामकारक आहे.