Coronavirus : ‘कोरोना’ अजूनही ‘शिखरा’वर जाणं बाकी, दिल्ली-मुंबईत लोकल ट्रान्समिशन सुरू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना संसर्गाच्या सतत वाढणार्‍या प्रकरणांच्या दरम्यान एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरात लोकल ट्रान्समिशन होऊ लागले आहे. एवढेच नव्हे, देशात 10 ते 12 अशी शहरे आहेत जेथे लोकल ट्रान्समिशनची शक्यता जास्त आहे. त्यांनी हे सुद्धा म्हटले की, देशात कोरोना व्हायरसचे पिक अजून आलेले नाही. अशी शक्यता आहे की, हे देशाच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

डॉ. रणदीप गुलेरिया इंडिया टुडे चॅनलशी बोलत होते. ते म्हणाले, जेव्हा आपल्या येथे नवी प्रकरणे कमी होऊ लागतील तेव्हा आपण म्हणून शकतो की आता आम्ही यावर नियंत्रण ठेवत आहोत. आपल्या देशाची लोकसंख्या इतकी जास्त आहे की, आपल्या येथे जास्त प्रकरणे असणे स्वाभाविक आहे.

डॉ. गुलेरिया म्हणाले, देशात 10 ते 12 शहरे अशी आहेत जेथून 70 ते 80 टक्के प्रकरणे समोर येत आहेत. अशात आपल्याला या शहरांवर फोकस केले पाहिजे. या शहरांसाठी नियोजन करावे लागेल, तेव्हा आपण चेन ऑफ ट्रान्समिशन रोखू शकतो.

देशात या राज्यांमध्ये रोज 10 हजारच्या जवळपास नवी प्रकरणे समोर येत आहेत. सध्या देशभरात संक्रमित रूग्णांची संख्या वाढून 2.46 लाखपेक्षा जास्त झाली आहे.