COVID -19 : गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 93337 नवे पॉझिटिव्ह तर 1247 जणांचा मृत्यू, बधितांचा संख्या 53 लाखांच्या पुढे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरसचा वेग कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांचा ग्राफ वेगाने वर चढत आहे. रोज कोरोनाच्या 90 हजारपेक्षा जास्त केस समोर येत आहेत. मागील 24 तासात कोरोनाची 93 हजार 337 नवी प्रकरणे समोर आली आहेत, तर 1247 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील एका दिवसात नव्या केस आल्यानंतर देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 53, 08,014 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात सध्या कोरोनाच्या 10 लाख 13 हजार 964 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत, तर कोरोना संसर्गामुळे 85 हजार 619 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 42 लाख 8 हजार 431 लोक रिकव्हर झाले आहेत. आयसीएमआरनुसार, देशात मागील 24 तासात 8,81,911 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत 6,24,54,254 लोकांची चाचणी केली गेली आहे.

महाराष्ट्रात स्थिती बिकट
महाराष्ट्रात शुक्रवारी कोविड-19 ची 21,656 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर राज्यात संक्रमितांची संख्या वाढून 11,67,496 झाली आहे. आरोग्य विभागानुसार, मागील 24 तासात 405 रूग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात मृतांची एकुण संख्या 31,791 झाली आहे. उपचारानंतर शुक्रवारी एकुण 22,078 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, ज्यामुळे राज्यात बरे झालेल्या रूग्णांची एकुण संख्या वाढून 8,34,432 झाली आहे. राज्यात सध्या 3,00,887 रूग्णांवर उपचार सुरू आहे.

मुंबईत 24 तासात 2,283 नवे रूग्ण
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत एका दिवसात 2,283 प्रकरणे समोर आल्यानंतर एकुण प्रकरणे 1,80,668 वर पोहचली आहेत, तर आणखी 52 रूग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकुण मृतांची संख्या वाढून 8,375 झाली आहे. पुणे शहरात कोविड-19 ची नवी 1,875 नवी प्रकरणे समोर आली, ज्यामुळे संक्रमितांची एकुण संख्या 1,38,268 झाली आहे, तर या आजारामुळे आणखी 28 लोकांचा मृत्यू झाल्याने पुण्यात एकुण मृतांची संख्या वाढून 3,165 पर्यंत पोहचली आहे.