Coronavirus : एकाच दिवसात आढळले ‘कोरोना’चे विक्रमी 90 हजारांहून जास्त नवे पॉझिटिव्ह, 1065 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांची संख्या दररोज नवीन रेकॉर्ड करत आहे. शनिवारी कोरोना रूग्णांची संख्या विक्रमी 90 हजाराच्या पुढे पोहचली. मागील 24 तासात कोरोनाची 90 हजार 632 नवी प्रकरणे समोर आली, तर 1065 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन केस आल्यानंतर देशात एकुण कोरोना रूग्णांची संख्या 41, 13,811 झाली आहे. शुक्रवारी देशात 86,432 नवे रूग्ण सापडले होते, तर 1089 लोकांचा मृत्यू झाला होता. भारत आता जगात कोरोना संक्रमित प्रकरणांत ब्राझीलपासून अवघा 10 हजाराने मागे आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात सध्या कोरोनाच्या 8 लाख 62 हजार 320 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत, तर कोरोना संसर्गामुळे 70 हजार 626 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 31 लाख 80 हजार 865 लोक बरे झाले आहेत. आयसीएमआरनुसार, देशात मागील 24 तासात 10,92,654 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत 4,88,31,145 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. कोरोना चाचणीमुळे रूग्णांचा शोध घेणे सोपे जाते आणि ते लवकर बरे होतात.

महाराष्ट्रात शनिवारी कोविड-19 ची 20,801 प्रकरणे समोर आली, जी आतापर्यंत कोणत्याही एका दिवसातील सर्वात मोठी संख्या आहे. यासोबतच राज्यात एकुण प्रकरणे वाढून 8,83,862, झाली आहेत. आरोग्य विभागानुसार 312 रूग्णांचा मृत्यू होण्यासह राज्यात आतापर्यंत एकुण मृतांची संख्या वाढून 26,276 झाली आहे. राज्यात लागोपाठ चौथ्या दिवशी सर्वाधिक संख्येत प्रकरणे समोर आली आहेत. शुक्रवारी 19,218 प्रकरणे समोर आली होती. शनिवारी एकुण 10,801 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात सध्या एकुण 2,20,661 संक्रमित रूग्णांवर उपचार सुरू आहे.