Coronavirus : देशातील ‘कोरोना’ बाधित रुग्णांची संख्या पोहोचली 60 वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या भारतात दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जवळपास ६० जणांना या विषाणूची लागण झाली आहे. राजस्थान आणि दिल्लीत पुन्हा एक-एक असे दोन रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं की, दिल्लीमध्ये जवळपास ५ रुग्ण आढळले असून त्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच उत्तर प्रदेशात देखील ही संख्या वाढली असून जवळपास ९ रुग्ण समोर आली आहेत. त्यामुळे भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ही ६० पर्यंत पोहोचली आहे. या ६० रुग्णांपैकी १६ रुग्ण हे इटलीचे आहेत.

या राज्यांच्या पाठोपाठ केरळमध्ये ही संख्या नऊवर पोहोचली असून महाराष्ट्रात ५, कर्नाटकमध्ये ४ आणि लडाखमध्ये २ कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत. तर राजस्थान, तमिळनाडू, तेलंगण, जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये कोरोनाचे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. केरळमधील ९ पैकी ३ रुग्ण उपचारादरम्यान बरे झाल्याचे निदर्शनात आले आहे, त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी व्हिडिओद्वारे दिल्लीतील मेदांता आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांशी संपर्क साधला. तसेच सध्याला नियमानुसार संशयित रुग्णांची दोन वेळेस चाचणी केली जात आहे.