Coronavirus : ‘कोरोना’चे भारतात समोर आले 28 केस, आतापर्यंत तिघे बरे झाले : आरोग्यमंत्री हर्षवर्धन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात जवळपास 70 देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसने आता भारतात लोकांची भीती वाढली आहे. यावर बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे एकूण 28 बाधित रुग्ण आढळले आहेत. यात केरळमध्ये सुरुवातीला तीन रुग्ण आढळले होते. कोरोनाच्या पीडितांची माहिती देताना ते म्हणाले, 17 लोकांचा इटालियन ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये 1 भारतीय आहेत, जो ड्रायवर आहे. बाकी आग्रा आणि दुसऱ्या काही ठिकाणांवरील आहे.

आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले, भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानातील प्रवाशांचे स्क्रीनिंग केली जाते आहे. दिल्ली सरकारला डॉक्टरांची टीम तयार करण्यास सांगण्यात आले आहे, ज्याने कोरोनाचा प्रसार रोखता येईल. ते म्हणाले, दिल्ली प्रकरणात आम्हाला कळाले की पीडित कमीत कमी 66 लोकांच्या संपर्कात होता. त्याच्या आग्रा येथील कुटूंबात 6 लोक कोरोनाने बाधित आढळले आहेत.

सरकार कोरोनाशी लढण्यासाठी तयार असल्याचे सांगताना ते म्हणाले, 15 लॅबोरेटरी यापूर्वी तयार ठेवण्यात आल्या होत्या. आता 19 आणखी नव्या लॅबोरेटरी तयार केला गेल्या आहेत. म्हणजे एकूण 34 लॅब आहेत. इराणहून भारतात येणाऱ्यांसाठी इराणमध्ये लॅब तयार करण्यासाठी आज साहित्य पाठवण्यात येईल आणि यावर चर्चा करण्यासाठी 3 वाजता ग्रुप ऑफ मिनिस्टर्ससोबत बैठक पार पडणार आहे.