Coronavirus India : गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 83809 नवे पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या 50 लाखाच्या टप्प्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमितांची संख्या 50 लाखांच्या जवळ पोहचली आहे. 24 तासात कोरोनाचे 83 हजार 809 नवे रूग्ण सापडले आहेत. यासोबतच संक्रमितांची एकुण संख्या 49 लाख 30 हजार 237 झाली आहे. तर, एका दिवसात 1 हजार 54 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे, ज्यानंतर मृत्यूंची एकुण संख्या सुद्धा 80 हजारच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत 80 हजार 776 लोकांनी या व्हायरसमुळे जीव गमावला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 38 लाख 59 हजार 400 लोक कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. सोमवारी 79 हजार 113 लोकांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. आंध्र प्रदेश, तमिळनाडु, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि तेलंगनामधून सोमवारी चांगली बातमी समोर आली आहे. येथे 24 तासांच्या आत संक्रमितांची बरे होण्याची संख्या वाढली आहे. आता 9 लाख 90 हजार 61 रूग्ण असे आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डब्ल्यूएचओनुसार, मागील 24 तासात विक्रमी 3,07,930 रूग्ण सापडले आहेत, जी आतापर्यंत कोणत्याही दिवसात सापडलेल्या रूग्णांपेक्षा सर्वात जास्त संख्या आहे. यामध्ये 60 टक्के केस तीन देश अमेरिका, ब्राझील आणि भारतात सापडल्या आहेत. जगात मृत्यूंची संख्या 9,17,417 पर्यंत पोहचली आहे.

कोरोना प्रभावित प्रमुख राज्यांची स्थिती
महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाची 17 हजार 66 नवी प्रकरणे समोर आली. 15 हजार 789 डिस्चार्ज झाले आणि 257 मृत्यू झाले. राज्यात एकुण प्रकरणांची संख्या वाढून 10 लाख 77 हजार 374 झाली आहे. यामध्ये 7 लाख 55 हजार 850 लोक बरे झाले, तर 2 लाख 91 हजार 256 रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.