Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 97894 नवे पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 51 लाखांच्या पुढं

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमितांचा आकडा 51 लांखाच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 51 लाख 18 हजार 254 लोक कोरोनाने संक्रमित झाले आहेत. 24 तासात कोरोनाचे विक्रमी 97 हजार 894 नवे रूग्ण सापडले. बुधवारी 1,132 लोकांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत 83 हजार 198 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर बरे झालेल्या रूग्णांची संख्या सुद्धा 40 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. आतापर्यंत 40 लाख 25 हजार 80 लोक बरे झाले आहेत. बुधवारी विक्रमी 82 हजार 922 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 10 लाख 9 हजार 976 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना व्हायरस महामारीविरूद्ध लढाईत भारतासाठी सप्टेंबर महिना खुप वाईट ठरत आहे. भारतात 15 दिवसात 13,08,991 प्रकरणे समोर आली, अमेरिकेत 5,57,657 प्रकरणे नोंदली गेली आणि ब्राझील जो या यादीत तिसर्‍या स्थानावर आहे, तेथे 4,83,299 प्रकरणे नोंदली गेली. एवढेच नाही तर व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूच्या यादीत सुद्धा भारत सर्वात वर आहे. भारतात 15 दिवसांच्या कालावधीत 16,307 लोकांचा मृत्यू झाला, तर अमेरिका आणि ब्राझीलमध्ये अनुक्रमे 11,461 आणि 11,178 मृत्यूंची नोंद झाली.

राज्यात सापडले 23 हजार 365 नवे रूग्ण
महाराष्ट्रात बुधवारी कोरोना व्हायरसची 23 हजार 365 नवी प्रकरणे समोर आली. यासोबतच राज्यात संक्रमितांची संख्या वाढून 11 लाख 21 हजार 221 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एकुण 7 लाख 92 हजार 832 लोक बरे झाले आहेत. सध्या 2 लाख 97 हजार 125 रूग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 30 हजार 883 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 474 संक्रमितांचा जीव गेला आहे.