देशात ‘कोरोना’ रूग्णांचा आकडा 79 लाखांच्या पुढं, 24 तासात सापडले 45149 नवे रूग्ण, 480 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमितांचा आकडा 79 लाखांच्या पुढे गेला आहे. मागील 24 तासात कोरोनाचे 45 हजार 149 पेक्षा जास्त रूग्ण सापडले आणि 480 संक्रमितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे 79 लाख 9 हजार 960 लोक संक्रमित झाले आहेत. दिलासादायक बाब ही आहे की, यापैकी 71 लाख 37 हजार 229 लोक बरे झाले आहेत, तर 1 लाख 19 हजार 14 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 6 लाख 53 हजार 717 रूग्णांवर उपचार सुरू आहे.

आकड्यांवर दृष्टीक्षेप टाकल्यास देशातील 14 राज्य आणि केंद्र शासित राज्यांमध्ये कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1% पेक्षासुद्धा कमी आहे. सर्वात जास्त 3.14% डेथ रेट पंजाब आणि 2.63% महाराष्ट्राचा आहे. मिझोराम देशातील पहिले राज्य आहे, जेथे कोरोनामुळे अद्याप एकही मृत्यू झालेला नाही. येथे अजूनपर्यंत 2,447 लोक संक्रमित झाले आहेत, परंतु सरकारने मोठ्या प्रमाणात संसर्गावर नियंत्रण मिळवले आहे.

किती आहे रिकव्हरी रेट आणि पॉझिटिव्हिटी रेट?
मागील 5 दिवसात रिकव्हरी रेटमध्ये 2% ची वाढ झाली आहे. 19 ऑक्टोबरला 87% रिकव्हरी रेट होता, जो आता वाढून 89.74% झाला आहे. मागील 3 दिवसात अ‍ॅक्टिव्ह केसमध्ये सुद्धा 58 हजारची घट दिसून आली आहे. देशात आता 16 राज्य आणि केंद्र शासित राज्य अशी आहेत, जेथे अ‍ॅक्टिव्ह केस 5 हजारपेक्षा कमी झाल्या आहेत. यशिवाय उत्तराखंड, पंजाब, मणिपुर, पदुचेरी, गोवा, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नगालँड, मेघालय, लडाख आणि चंडीगढमध्ये सुद्धा अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या कमी आहे.

महाराष्ट्रात 6059 नवे रूग्ण सापडले
महाराष्ट्रात मागील 24 तासात 6059 नवे रूग्ण सापडले, 5648 लोक रिकव्हर झाले आणि 112 रूग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 16 लाख 45 हजार 20 लोक संक्रमित आढळले आहेत. यापैकी 1 लाख 40 हजार 486 रूग्णांवर अजून उपचार सुरू आहे, तर 14 लाख 60 हजार 755 लोक बरे झाले आहेत. संसर्गामुळे आतापर्यंत 43 हजार 264 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

You might also like