Covid-19 in India : देशात 24 तासात सापडले ‘कोरोना’चे 27071 नवे रूग्ण, 336 मृत्यू, आतापर्यंत 98.81 लाख केस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसची आतापर्यंत 98 लाख 81 हजार 380 प्रकरणे सापडली आहेत. 24 तासात कोरोनाचे 27 हजार 71 नवे रूग्ण सापडले. रविवारी एकुण 336 लोकांचा मृत्यू झाला आणि 30 हजार 695 लोक रिकव्हर झाले. भारतात कोरोनाच्या संसर्गाने आतापर्यंत 1 लाख 43 हजार 352 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 93 लाख 83 हजार 879 लोक बरे झाले आहेत. तर 24 तासात 3 हजार 138 अ‍ॅक्टिव्ह केस कमी झाल्या आहेत. देशात सध्या एकुण 3 लाख 54 हजार 904 (एकुण संक्रमितांच्या 3.62%) अ‍ॅक्टिव्ह केस आहेत, म्हणजे इतक्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

अ‍ॅक्टिव्ह केसच्या बाबतीत जगात भारत आठव्या स्थानावर आहे. कोरोना संक्रमितांच्या संख्येच्या हिशेबाने भारत जगातील सर्वात प्रभावी दुसरा देश आहे. जगात रिकव्हरीत अमेरिकेनंतर सर्वात जास्त प्रभावी भारत आहे. मृतांच्या प्रकरणात अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा नंबर आहे.

महाराष्ट्रात 3717 नवे रूग्ण
महाराष्ट्रात 3717 लोक मागील 24 तासांच्या आत संक्रमित आढळले. 3083 लोक रिकव्हर झाले आणि 70 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 18 लाख 80 हजार 416 लोकांना संसर्ग झाला आहे. यामध्ये 74 हजार 104 रूग्णांवर उपचार सुरू आहे. 17 लाख 57 हजार 5 रूग्ण बरे झाले आहेत. संसर्गाने जीव गमावणार्‍यांची एकुण संख्या आता 48 हजार 209 झाली आहे.

राजधानी दिल्लीत रविवारी 1984 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 2539 लोक बरे झाले आणि 33 जणांचा मृत्य झाला. आतापर्यंत 6 लाख 7 हजार 454 लोकांना संसर्ग झाला आहे. यामध्ये 16 हजार 785 रूग्णांवर उपचार सुरू आहे, तर 5 लाख 80 हजार 655 लोक बरे झाले आहेत. संसर्गाने जीव गमावणार्‍यांची संख्या आता 10014 झाली आहे.