Coronavirus : राज्यात ‘कोरोना’च्या रूग्णांची संख्या वाढली, आकडा 230 वर पोहचला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात आज कोरोनाचे १० नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत ५, पुण्यात ३ आणि बुलढाण्यात २ असे संसर्गित रुग्ण सापडले आहे. देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक २३० रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ३९ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात सोमवारी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

देशात लॉक डाऊन चा आज ७ वा दिवस असून, कोरोनाचा संसर्ग मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात संसर्गित रुग्णांची संख्या १२५१ पोहचली आहे. त्यापैकी १११७ सक्रिय प्रकरणे आहे. देशात आतापर्यंत ३२ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर १०२ जणांनी यावरती मात केली आहे.

दोन जणांचा बळी
महाराष्ट्रात सोमवारी दोन रुग्णांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील एका रुग्णावर फोर्टिस रुग्णालयात ७८ वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरु होते. त्यांना रक्तदाब आणि हृदयरोगाचा त्रास होता. तर पुण्यात दीनानाथ मंगेशकर येथे असलेल्या ५२ वर्षीय रुग्णावर उपचार सुरु होते. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता आणि राज्यात आतापर्यंत ३९ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे.