Coronavirus : जम्मूच्या आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल असलेल्या 2 रूग्णांची टेस्ट +ve, भारतातील संख्या 33 वर

नवी दिल्ली : वृत्त्त संस्था – जम्मूच्या आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल झालेल्या दोन रूग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रूग्णांची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. हे दोन्ही रूग्ण इटली आणि साउथ कोरियाहून आले होते. त्यांना तेथेच कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाच्या या दोन नव्या केस दाखल झाल्याने देशातील एकुण रूग्णांची संख्या 33 झाली आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन हे सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असून कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देणार आहेत.

जगातील 87 देशांत शुक्रवारी कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे वाढून 98,123 झाली आणि मृतांचा आकडा 3,385 वर पोहचला. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

गुरूवारपर्यंत कोरोना व्हायरसची 613 नवी प्रकरणे समोर आली होती आणि 39 लोकांचा मृत्यू झाला होता. हाँगकाँग आणि मकाऊ सोडून चीनमध्ये कोरोनाची 80,552 प्रकरणे समोर आली आहेत. ज्यापैकी 3,042 लोकांचा मृत्यू झाला आहे.

चीनच्या बाहेर एकुण 17,571 प्रकरणे समोर आली आहेत आणि 343 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर कोरोनाचा सर्वात प्रादुर्भाव झालेल्या देशांमध्ये दक्षिण कोरिया (6,284 प्रकरणे, 42 मृत्यू), इटली (3,858 प्रकरणे, 148 मृत्यू), इराण (3,513 प्रकरणे, 124 मृत्यू) तर फ्रान्स (423 प्रकरणे, 7 मृत्यू) आहेत.

गुरूवारपर्यंत पॅलेस्टाईन आणि भूतानमध्ये सुद्धा कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे समोर आली होती. तर इराणमध्ये कोरोना व्हायरसच्या संक्रमनामुळे पर्यटन मंत्रालय यावर्षी फेब्रुवारीमध्ये तेथून भारतात आलेल्या 450 इराणी प्रवाशांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. पर्यटन मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, मंत्रालयाने त्यांना पत्र लिहून त्या इराणी प्रवाशांचा शोध घेण्यास सांगितले आहे.

इराण हा तिसरा देश आहे, जेथे कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. इराणमध्ये 124 लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार इराणहून भारतात येणारे बहुतांश पर्यटक पर्यटन आणि व्यवसायिक वीजा घेऊन देशात आले आहेत. यापूर्वी गुरूवारी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, ते इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी नियमित उड्डाणांची व्यवस्था करत आहेत.