Coronavirus Cases Today In India | भारतात कोरोनाचा कहर ! गेल्या 24 तासात समोर आली 1.79 लाख नवीन प्रकरणे; परंतु ‘या’ गोष्टीमुळं मिळाला दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Coronavirus Cases Today In India | भारतात मागील 24 तासात कोरोना व्हायरस (Corona virus) ची 1,79,723 नवी प्रकरणे आली आहेत आणि 46,569 लोक बरे झाले आहेत. तर, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकड्यांनुसार या महामारीने काल 146 रूग्णांचा बळी घेतला. (Coronavirus Cases Today In India)

 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे आयसीएमआरनुसार, भारतात काल कोरोना व्हायरससाठी 13,52,717 सॅम्पल टेस्ट करण्यात आली. सोबतच देशात कालपर्यंत एकुण 69,15,75,352 सॅम्पल करण्यात आले आहेत.

 

केंद्र सरकारकडून जारी आकड्यांवर नजर टाकली तर देशात आतापर्यंत एकुण 3,57,07,727 प्रकरणे झाली आहेत. सध्या सक्रिय प्रकरणे 7,23,619 आहेत. आतापर्यंत या महामारीवर 3,45,00,172 लोकांनी मात केली आहे. मात्र, या व्हायरसने देशात आतापर्यंत एकुण 4,83,936 लोकांचा बळी घेतला आहे. (Coronavirus Cases Today In India)

 

या महामारीचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम चालवली जात आहे.
आता देशात व्हॅक्सीनचे 1,51,94,05,951 डोस दिले गेले आहेत.
यामध्ये पहिल्या आणि दुसर्‍या डोसच्या आकड्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात संसर्गाची 44,388 नवी प्रकरणे, 12 रूग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात रविवार कोरोना व्हायरस संसर्गाची 44,388 प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमितांची एकुण संख्या 69,20,044 झाली.
याशिवाय 12 रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची एकुण संख्या 1,41,639 वर पोहचली आहे.

 

राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
एक दिवसापूर्वी राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाची एकुण 41,434 प्रकरणे समोर आली होती आणि 13 रूग्णांचा मृत्यू झाला होता.

 

आरोग्य विभागाने सांगितले की, दिवसभरात 15,351 लोक बरे झाले.
आतापर्यंत बरे झालेल्या लोकांची संख्या 65,72,432 झाली आहे.
दरम्यान दिल्लीत काल 17 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. तसेच संसर्गाची 22,751 नवी प्रकरणे समोर आली.

 

Web Title :-  Coronavirus Cases Today In India | corona havoc in india 1 lakh 79 thousand new cases surfaced in last 24 hours relief brought recovery

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police | दुर्दैवी ! ट्रॅक्टर कारच्या अपघातात दोघा पोलिसांचा जागीच मृत्यू; 2 पोलीस गंभीर जखमी

 

Flu And Corona Fever | कोरोनापेक्षा सध्या पसरलेला ताप खुपच वेगळा, ठणठणीत व मजबूत राहण्यासाठी ‘हे’ 8 उपाय आवश्य करा, जाणून घ्या