Alert ! WHO ने दिलाय इशारा; ‘कोरोनावर उपचार करताना ‘ही’ औषधं वापरणं धोक्याचे’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन : देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. पण कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण बरे होण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच काही औषधे घेणे सुरु करतात.

https://twitter.com/doctorsoumya/status/1391865641330688000

गोवा सरकारने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयवरमेक्टिन या औषधाला परवानगी दिली. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी या औषधाच्या वापराबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. आयवरमेक्टिन हे औषध कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सुरक्षित नाही. सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विट करून म्हटले, की WHO आयवरमेक्टिन औषधाच्या वापराविरोधात आहे. कोणत्याही औषधाचे सुरक्षा आणि किती प्रभावी आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या औषधाचा वापर फक्त क्लिनिकल ट्रायलमध्ये व्हायला हवा. त्यांनी ट्विटमध्ये मर्क नावाच्या कंपनीचा हवाला देत या औषधाबद्दल माहिती दिली आहे.

दरम्यान, आयवरमेक्टिन हे औषध क्लिनिकल ट्रायलमध्ये किती सुरक्षित आहे याचा डेटाही उपलब्ध नाही. अमेरिकेत हे औषध STROMECTOL नावाने मिळते. या औषधांचे अनेक साईड इफेक्ट असल्याचा दावा केला जातो. मागील 2 महिन्यांपासून WHO ने दुसऱ्यांदा आयवरमेक्टिन औषधाच्या वापरावरून धोक्याचा इशारा दिला आहे.