Coronavirus : रॅपिड अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आल्यास लोकांनी पुन्हा तपासणी करावी, केंद्र सरकारनं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना निर्देश दिले आहे की, कोविड-19 ची लक्षणे असणार्‍या जेवढ्या रूग्णांची रॅपिड अँटीजन चाचणी संसर्गमुक्त झाल्याची आली आहे, त्यांची आरटी-पीसीआर चाचणी केली जावी. ज्यामुळे कोरोना व्हायरसने संक्रमित प्रत्येक व्यक्तीचा शोध घेता येईल आणि संसर्ग पसरण्यापासून रोखता येईल.

आरोग्य मंत्रालयाचे दिशा-निर्देश
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिशा-निर्देशांमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, आरएटीमध्ये संसर्गमुक्त आढळलेल्या सर्व प्रकरणांत आणि आरएटीमध्ये संसर्गमुक्त आढळलेल्या लक्षण नसलेल्या प्रकरणांत चाचणीच्या दोन किंवा तीन दिवसानंतर लक्षणे दिसू लागतात, त्यांची आरटी-पीसीआरद्वारे चाचाणी करण्याची गरज आहे. ज्या प्रकरणांमध्ये संसर्गमुक्त झाल्याचा दुजोरा चुकीचा आहे, हे वेळेत समजल्याने आयसोलेट करता येऊ शकते. सोबतच हॉस्पीटलमध्ये दाखल करता येऊ शकते.

ही आहे रणनीती
मंत्रालयाने हे सुद्धा म्हटले की, संसर्गाच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय टीम किंवा अधिकार्‍यांकडून तात्काळ एक देखरेख प्रणाली स्थापन करण्यात यावी. हे पथक राज्य आणि जिल्ह्यांमध्ये नियमित होत असलेल्या रॅपिड अँटीजन चाचण्यांच्या माहितीचे विश्लेषण करतील. सोबतच हे देखील ठरवा की, लक्षण असणारे जे रूग्ण संसर्गमुक्त आढळले आहेत, त्यांची चाचणी करण्यात कोणत्याही प्रकारचा उशीर होऊ नये.