Coronavirus : ‘कोरोना’मुळं मृत्यू झालेल्याच्या कुटुंबियांना आता नाही मिळणार 4 लाख, सरकारनं परत घेतला निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे. यापूर्वी मोदी सरकारने कोरोना व्हायरसने मृत्यू झाल्यास स्टेट डिजास्टर रेस्पॉन्स फंडमधून मृतकांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. भारत सरकारचे ज्वॉइंट सेक्रेटरी संजीव कुमार जिंदल यांनी अधिसूचना जारी करत ही माहिती दिली.

ते म्हणाले की आता स्टेट डिजास्टर रेस्पॉन्स फंडअंतर्गत कोरोना व्हायरससाठी उपचारादरम्यान झालेला खर्च देण्यात येईल. म्हणजेच जर कोणी कोरोनाच्या विळख्यात येते तर त्यांच्या आयसोलेशन आणि चाचणीसंबंधित उपचार होई पर्यंतचा खर्च सरकार करेल. स्टेट डिजास्टर रेस्पॉन्स फंड मधून ही रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल.

कोरोना पसरण्यास सुरुवात झाल्यानंतर भारत सरकारने ही आपत्ती म्हणून घोषित केले आहे. भारतात आतापर्यंत 89 प्रकरणं समोर आली. यातील 10 वर उपचार करुन त्यांनी डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. कोरोनामुळे एक मृत्यू कर्नाटक, दुसरा मृत्यू दिल्ली तर तिसरा मृत्यू महाराष्ट्रात बुलढाण्यात झाला.

या व्हायरसमुळे अनेक समारंभ स्थगित करण्यात आले आहेत. सिनेमागृह बंद करण्यात आली आहेत. जोपर्यंत व्हायरस पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत परिस्थिती अशीच असेल.

भारताने 15 एप्रिलपर्यंतचे सर्व व्हिसा रद्द केले आहेत. सर्व राज्यांनी राज्यपातळीवर खबरदारी घेतली आहे. राजकीय, सरकारी, संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था, एम्पॉयमेंट आणि प्रोजेक्ट व्हिसा सोडून सर्व व्हिसा 15 एप्रिलपर्यंत न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय नागरिकांना व्हिसा मुक्त प्रवासाची सुविधा देखील 15 एप्रिल पर्यंत रोखण्यात आली आहे. फ्रांस,जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांवर नियमित आणि ई-व्हिसावर रोख आणण्यात आली आहे, चीन, साऊथ कोरिया, जपान, इटली वर देखील अशी रोख लावण्यात आली आहे.

अमेरिका आणि स्पेनमध्ये आपातकाल घोषित –
अमेरिका आणि स्पेनमध्ये कोरोना व्हायरसमुळे राष्ट्रीय आपातकालची घोषणा करण्यात आली आहे. डब्ल्यूएचओने कोरोना व्हायरसला महामारी घोषित केले आहे.