Coronavirus Face : आतापर्यंत ‘कोरोना’नं 8 वेळा ‘फेस’ बदलला, प्रत्येक चेहर्‍याचा ‘धोका’ सारखाच

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  जगभरातील वैज्ञानिकांना कोरोना व्हायरसने हैराण केले असून वैज्ञानिक या व्हायरसचे औषध बनवण्यासाठीही त्रस्त आहेत कारण तो सतत बदलत आहे म्हणजे त्याचे रूप बदलत आहे. या व्हायरसने चीनच्या वुहानमधून आल्यावर आतापर्यंत त्याने आपली स्ट्रेन आठ वेळा बदलली आहे. म्हणजे रंग-रूप बदलत आहे. या आठ स्ट्रेनवर जगभरातील वैज्ञानिक काम करत आहेत. हे सगळे आठ स्ट्रेन एकमेकांशी जुळणारे आहेत पण फारच थोड्या फरकासह. वैज्ञानिकांचा दावा आहे कि कोणताही स्ट्रेन दुसऱ्या स्ट्रेनपेक्षा जास्त धोकादायक किंवा जीवघेणा दिसत नाहीये. सगळ्या स्ट्रेनचा दुष्परिणाम एकसारखाच आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे प्राध्यापक चार्ल्स चिउ यांनी सांगितले की, हा व्हायरस सतत आपले स्वरूप बदलत आहे. पण आतून याच्या RNA आणि DNA मध्ये थोडा बदल होत आहे. आत जास्त बदल होत नाहीये. वैज्ञानिक या गोष्टीमुळेही हैराण आहेत की, कोरोनाचे प्रत्येक रुप घातक आहे जितके पहिले होते. पण हे समजत नाहीये की, कोणत्या स्वरूपातील कोरोनाने लोकांना जास्त संक्रमित केले आहे. उदाहरणार्थ, कॅलिफोर्नियामध्ये जे संक्रमण पसरले आहे, तेच मागच्या आठवड्यात एका स्ट्रेनच्या कोरोना व्हायरसने पसरले. अमेरिकेच्या दुसऱ्या भागात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेन पेक्षा कॅलिफोर्नियाची स्ट्रेन वेगळी आहे.

corona-1

प्रा. चार्ल्स चिउ यांनी म्हटले की, आठ रूप वेगवेगळी नक्की आहेत, पण सिद्धांतिक रूपात हे एकच आहेत. कारण यांच्यात जो बदल होत आहे ते खूप हळू आहे. कोरोना व्हायरसचे जे स्ट्रेन बदलत आहेत त्यांची बदलण्याची गती ८ ते १० पट कमी आहे. जेव्हा फ्लू ची जास्त असते. आतापर्यंत वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसच्या ३० हजार पेक्षा जास्त जीनोम बेस जोड्यांचा अभ्यास केला असून त्यात केवळ ११ बेस जोड्याच आपापसात बदलताना दिसल्या. म्हणजे बेस जोड्यांमध्ये जास्त बदल नाहीये. केवळ वरच्या स्तरावर व्हायरस आपले रूप हलके बदल करत आहे.

corona-2

याचा अर्थ आहे की, कोरोना व्हायरस आपले रुप नक्की बदलत आहे, पण यामुळे त्याच्या लक्षणांमध्ये कोणताही फरक नाहीये. केवळ एकच अडचण आहे की, एका स्ट्रेनवरील लसीचा शोध होतो, तोपर्यंत दुसरा स्ट्रेन बनून जातो. कोरोनाचे स्वरूप बदलण्याचा सर्वात मोठा धोका हा आहे की, जर एक स्ट्रेन कोणत्याही व्यक्तीला सामान्य स्वरूपाने त्रस्त करत असेल तर तोच स्ट्रेन दुसऱ्या व्यक्तीसाठी जीवघेणा सिद्ध होत आहे. म्हणजे स्ट्रेनचा परिणाम व्यक्तीच्या प्रतिकार क्षमतेवर अवलंबून आहे. या स्ट्रेनचा अभ्यास नेक्स्टस्ट्रेन डॉट ओआरजी नावाच्या एका वेबसाइटने केला आहे. तिथे जाऊन तुम्ही कोरोना व्हायरसचे वेगवेगळी स्वरूपे पाहू शकता.

corona-3