1.5 रुपयांच्या ‘या’ औषधाचा ‘कोरोना’ रूग्णांना होतोय फायदा, डॉक्टरांच्या वाढल्या अपेक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मधुमेह असलेल्या रूग्णांसाठी वापरले जाणारे स्वस्त औषध मेटफॉर्मिनपासून कोरोना रुग्णांनाही फायदा होऊ शकतो. चीनच्या वुहानमधील डॉक्टरांनी काही केस स्टडीच्या आधारे हे सांगितले आहे. त्याचवेळी अमेरिकेतील मिन्नेसोटा विद्यापीठातील संशोधकांचेही म्हणणे आहे की मेटफॉर्मिन औषध कोरोनामुळे रुग्णांच्या मृत्यूची जोखीम कमी करू शकते. मिन्नेसोटा विद्यापीठाने सुमारे 6 हजार रुग्णांचा अभ्यास केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनची प्रमुख आरोग्य संस्था नॅशनल हेल्थ सर्व्हिस आधीच हे औषध वापरत आहे. मधुमेहाबरोबरच स्तनाचा कर्करोग आणि हृदयरोगातही या औषधाचा फायदा असल्याचे म्हटले जाते.

हे औषध बरेच स्वस्त आहे आणि भारतात मेटफॉर्मिन 500 मिलीग्रामच्या टॅब्लेटची किंमत 1.5 रुपये आहे. टाइप 2 मधुमेहाचा उपचार करण्यासाठी हे औषध 1950 पासून वापरले जात आहे. वुहानमधील डॉक्टरांनी अलीकडेच त्यांचा अभ्यास प्रकाशित करत म्हटले की, कोरोनाची लागण झालेल्या आणि मेटफॉर्मिन औषधोपचार घेतलेल्या मधुमेह असलेल्या लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण हे औषध न घेणाऱ्यांपेक्षा कमी आहे. मेटफॉर्मिन घेतलेल्या कोरोनामधील गंभीर आजारी असलेल्या 104 रुग्णांच्या डेटाचा अभ्यास डॉक्टरांनी केला. या रुग्णांकडील डेटाची तुलना कोरोनामधील इतर 179 गंभीर रुग्णांशी केली गेली. या दरम्यान, रुग्णांची तुलना केली जात आहे ते देखील समान वय आणि लिंग असले पाहिजेत याची काळजी घेण्यात आली.

अभ्यासादरम्यान, वुहानमधील डॉक्टरांना आढळले की, मेटफॉर्मिन घेणारे केवळ 3 रुग्ण मरण पावले आहेत, तर इतक्याच गंभीर 22 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, ज्यांनी हे औषध घेतले नाही. काही अभ्यासांमधून असेही दिसून आले आहे की, लठ्ठपणा नसलेले लोक मधुमेह ग्रस्त आहेत, हे औषध वजन कमी करण्यास देखील मदत करते. त्याच वेळी हे देखील निदर्शनास आले आहे की, लठ्ठपणा असलेल्या लोकांना कोरोनाची समस्या जास्त असते आणि त्यांचे मृत्यूचे प्रमाणही जास्त असते.