पुण्यात पोल्ट्री उद्योगाचं मोठं ‘नुकसान’, फक्त 10 रूपये किलोनं विकलं जातंय ‘चिकन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चीनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरस आता जगभरातील अनेक देशांपर्यत येऊन पोहोचला आहे. भारतात देखील हा व्हायरस वेगाने पसरत असल्याचे दिसत आहे. यात आतापर्यंत भारतात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 82 लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यामुळे लोक दहशतीच्या छायेत वावरत आहेत. त्यामुळे लोक चिकन खाणे टाळत आहेत. पुण्यातील कुक्कुटपालन करणाऱ्यांना 10 रुपयांना जिवंत कोंबडी विकावी लागत आहे. सांगण्यात येत आहे की कुक्कुटपालन करणाऱ्यांचे 100 टक्के नुकसान होत आहे.

दुसरीकडे उत्तर प्रदेश पोल्ट्री फार्म असोसिएशनचे अध्यक्ष नवाब अली म्हणाले, देशात सर्वात स्वस्त कोंबड्या कर्नाटकात 10 रुपये किलोमध्ये विकले जात आहेत. महाराष्ट्रात 10, तेलंगणात 11, आंध्रप्रदेशात 12, मध्यप्रदेशात 22, ओडिसामध्ये 18 – 22 आणि गुजरातमध्ये 14 ते 28 रुपये किलोने कोंबड्या विकल्या जात आहेत. हा दर होलसेलचा आहे. काही ठिकाणी तर होलसेल व्यापारी आपल्या गाड्यांमध्ये कोंबड्या भरुन रस्तो-रस्ती 100 रुपयांच्या 3 कोंबड्या आणि 22 रुपयांच्या हिशोबाने कोंबड्या विकल्या जात आहेत.

अंड्याच्या दरात मोठी घसरणं 
कुक्कुटपालन करणारे अनिल शाक्य म्हणाले, 7 – 8 दिवसांपूर्वी 3.50 रुपयांपासून 3.75 रुपयांपर्यंत एक अंडे विकले जात होते पंरतु कोरोनाच्या दहशतीमुळे आज अंड्याचे दर 2.75 रुपये झाले आहेत. हे दर पोल्ट्री फार्म आणि होलसेलरसाठी आहेत. परंतु अद्यापही अंड्यांच्या दर कमी होण्याचा फायदा किरकोळ दरात विकत घेणाऱ्या ग्राहकांना मिळाला नाही. कारण साठेबाजी करणारे संधीचा फायदा घेऊन पोल्ट्री मधून स्वस्त अंडे खरेदी करत आहेत आणि कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवत आहेत.