Coronavirus : ‘कोरोना’वर चीन करतोय कमाई, 3500 कोटी रूपयांचा ‘सौदा’ करून पाठवले ‘निकृष्ट’ उपकरणं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जग कोरोना विषाणूशी झगडत आहे. अनेक देशांमध्ये चाचणी किट आणि मास्कची कमतरता आहे. अशा परिस्थितीत चीन नफा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनने अनेक देशांना खराब वैद्यकीय उपकरणे विकली आहेत. अशामध्ये नेदरलँड्स आणि स्पेनने खराब वैद्यकीय उपकरणे परत करण्याविषयी बोलले आहे.

नेदरलँडने चीनमधून आयात केलेले 6 लाख कोरोना व्हायरस फेस मास्क परत केले आहेत. मास्कमध्ये काहीतरी गडबड असल्याचे त्यांना समजताच नेदरलँड्सने हा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, नेदरलँडमधील चिनी दूतावासने नेदरलँड्स सरकारकडे संपर्क साधून हे प्रकरण लवकरच सोडवण्यास सांगितले आहे.

त्याचबरोबर स्पेननेही चिनी कंपनीकडून मागवलेले खराब कोरोना व्हायरस टेस्ट किट परत करण्यास सांगितले आहे. युरोपियन बाजारपेठेत रिकाम्या जागेवर चीन आपल्या वस्तूंची भरपाई करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

त्याचबरोबर स्पेनला किटपुरवठा करणारे शेनझेन बायोसी यांनी आपल्या बचावामध्ये म्हटले आहे की, त्याने चाचणी किट वापरण्याची पद्धत सांगितली नव्हती. स्पेन सरकारने असे म्हटले आहे की, चाचणी किटने चुकीचे निकाल दिले आहेत आणि सरकार त्यांना परत करत आहे. पण चिनी कंपनीने म्हटले आहे की, ते काही कोरोना व्हायरस टेस्ट किटला बदलतील.

यापूर्वी स्पेनचे आरोग्यमंत्री साल्वाडोर इला म्हणाले होते की, सुमारे 3518 कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे चीनकडून खरेदी करण्यात आली आहेत. यात 950 व्हेंटिलेटर, 55 लाख चाचणी किट, 10 कोडी ग्लव्ज आणि संरक्षक फेस मास्क यांचा समावेश आहे.

जग अशावेळी कोरोना विषाणूशी लढा देत असताना चीन वैद्यकीय उपकरणे निर्यात करीत आहे. अमेरिका, ब्रिटन, स्पेन, इटलीसह अनेक देशांमध्ये भयंकर कोरोना विषाणूचा साथीचा प्रादुर्भाव झाला आहे. इतर देशांमध्येही हा संसर्ग झपाट्याने पसरत आहे.

स्पॅनिश आरोपांवर, वैद्यकीय उपकरणे पुरवणाऱ्या शेनझेन बायोसी या कंपनीने म्हटले आहे की, नमुने नीट गोळा न केल्याने आणि नीट तपासणी न केल्यामुळे त्याचेही चुकीचे निकाल येऊ शकतात. स्पेनमध्ये कोरोना विषाणूमुळे 6800 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत, तर 80 हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.

त्याच वेळी अमेरिकेत 2480 हून अधिक, इटलीमध्ये 10,700 पेक्षा जास्त, इराणमध्ये 2600 पेक्षा जास्त, ब्रिटनमध्ये 1220 पेक्षा जास्त मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाले आहे. चीनमध्ये कोरोनामुळे अधिकृत मृत्यूची संख्या अवघी 3300 आहे. आतापर्यंत अमेरिकेत 1 लाख 42 हजारांहून अधिक, इटलीमध्ये 97 हजाराहून अधिक, स्पेनमध्ये 80 हजाराहून अधिक आणि जर्मनीत 62 हजारांहून अधिक आणि फ्रान्समध्ये 40 हजाराहून अधिक लोक कोरोना संक्रमित झाले आहे. जगात संक्रमित होणाऱ्या लोकांची एकूण संख्या 723,287 वर गेली आहे.