Coronavirus : चीनमध्ये मुस्लिमांचे अवयव काढून कोरोनाग्रस्तांवर उपचार – रिपोर्ट

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : जगभरात कोरोनाव्हायरस (कोविड -१९) ची प्रकरणे वाढत चालली असून इकडे चीनने मोठ्या प्रमाणात त्यावर नियंत्रण मिळविले आहे. दरम्यान, आता कोरोनाविरूद्धच्या ह्या चिनी मोहिमेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. माहितीनुसार, छावणीत बंदिस्त असलेले उइगर मुस्लिमांचे अवयव काढून चिनी सरकार कोरोना पीडितांवर उपचार करीत आहे. एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार अशी अनेक प्रकरणे उघडकीस आले आहेत, ज्यात कोरोना व्हायरस पीडिताचे प्राण वाचवण्यासाठी एखाद्या अवयवाची आवश्यक आहे आणि तो सहजतेने उपलब्ध करुन दिला जात आहे. दरम्यान, चीनवर असे आरोप लावले जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या ज्यामध्ये डिटेंशन सेंटर्समध्ये मुस्लिमांवर अत्याचार केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

माहितीनुसार, चीनने काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच डबल प्रत्यारोपणाच्या यशस्वी ऑपरेशनची घोषणा केली. हे ऑपरेशन कोरोना व्हायरसमुळे अवयव निकामी होणाऱ्या 59 वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी केले गेले. दरम्यान, कोरोनामुळे सामान्य तुलनेत मागणी खूप जास्त असूनही, या मनुष्याला दोन्ही भाग अवघ्या पाच दिवसात उपलब्ध झाले. अशा परिस्थितीत, हे अवयव कोठून आले आहेत? अशी शंका उपस्थित होत आहे.

अहवालात लिहिल्यानुसार, “जगाला आधीच चिंता आहे की चीनमधील सुमारे ३० लाख उइगर मुस्लीम बंदिस्त शिबिरांमध्ये राहत आहेत.” चिनी मानवाधिकार कार्यकर्ते देखील अशी शंका व्यक्त करतात की, चीनमध्ये फुफ्फुस येण्यासाठी वर्षांची प्रतीक्षा यादी आहे, परंतु कोरोनाच्या बाबतीत, ते केवळ काही दिवसातच उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तेदेखील परफेक्ट मॅच सोबत. ते पुढे म्हणाले की, अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी असणाऱ्या देशांमध्ये चीन मोडतो. दरम्यान, कोरोनाच्या बाबतीत, अशा बातम्या आतापर्यंत समोर आल्या आहेत ज्यामध्ये 10,000 लोकांना सहज अवयवदान झाले आहे.

चीनवर यापूर्वीही अनेक प्रश्न उपस्थित :
२९ फेब्रुवारी रोजी चीनमध्ये कार्यरत अवयवांच्या काळ्या धंद्यावरही आंतरराष्ट्रीय अहवाल समोर आला आहे. या अहवालात असा दावाही केला आहे की, छावणीमध्ये बंदिस्त असलेल्या उइगर मुस्लिमांची हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, डोळे आणि त्वचा देखील काळा बाजारात विकली जात आहे. उइगर शिक्षणतज्ज्ञ आणि व्हिसल ब्लोअर अबदूवेली अयूप यांनीही पूर्वी दावा केला होता की, डिटेंशन सेंटरमध्ये अमानुष गुन्हे केले जात आहेत. कोरोनामुळे, डिटेन्शन सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात ऑपरेशन केले जात आहेत आणि अवयव जबरदस्तीने काढून टाकले जात आहेत. दरम्यान, अनेक आंतरराष्ट्रीय एजन्सींनी चीनवर आरोप केला आहे की सरकार मुस्लिमांना नवीन औषधे आणि इतर वैद्यकीय चाचण्यांसाठी वापरत आहे. मात्र, चीन सरकार या डिटेन्शन कॅम्पला दहशतवाद आणि फुटीरताविरूद्ध लढा असे संबोधत आहे.