काय सांगता ! होय, मदत म्हणून इटलीनं दिलेलं वैद्यकीय साहित्य चीन इटलीलाच विकतोय

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे अमेरिका, इटली, फ्रान्स, स्पेनसारख्या देशांमध्ये दिवसाला शेकडो जणांचा करोनामुळे मृत्यू होत आहे. असे असताना दुसरीकडे ज्या चीनमधून या विषाणूचा जगभरामध्ये फैलाव झाला तेथे मात्र मरण पावणार्‍या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आता चीनमधून इतर देशांना आवश्यक असणार्‍या वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. यामध्ये मास्क, करोनाचा चाचणीसाठी लागणारे पीईई कीट्स आणि इतर वैद्यकीय सामानाचा समावेश आहे. मात्र, वुहान शहरामध्ये कोरोनाने थैमान घातले असताना इटलीने चीनला मदत म्हणून दिलेले काही वैद्यकीय साहित्य चीन इटलीला विकत आहे.

इटलीमध्ये कोरोनामुळे 10 हजारहून अधिक जणाचा मृत्यू झाला असून तिथे भीतीचे वातावरण आहे. आता चीनने इटलीला पीपीई कीट्स मदत म्हणून पाठवण्याची घोषणा केली आहे. मात्र, चीन पीपीई कीट्स इटलीला मदत म्हणून मोफत देण्याऐवजी विकत असल्याचा दावा केला आहे. जे कीट्स इटलीने चीनला मदत म्हणून पाठवले होते तेच कीट्स आता चीनकडून इटलीला विकत असल्याचे दिसून आले आहे.

कोरोनाचा युरोपमध्ये प्रादुर्भाव वाढण्यासाठी इटलीने चीनला मदत म्हणून लाखो पीपीई कीट्स पाठवले होते. चीनमधील जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता यावे यासाठी इटलीने मदत केली होती. आता इटलीमध्ये करोनाचा फैलाव झालेले असताना चीन इटलीली त्यापैकीच काही पीईई कीट परत पाठवत आहे. त्यातही यासाठी ते इटलीकडून पैसे घेत आहेत,