कोरोनाला पराभूत करण्यासाठी गाईचे दूध चीनच्या लोकांसाठी बनले शस्त्र !

नवी दिल्ली : संपूर्ण जग अजूनही कोरोनाच्या महामारीला तोंड देत आहे. तर भारत दुसर्‍या लाटेचा मारा सहन करत आहे. मात्र, अनेक देशांनी महामारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. लोक व्हॅक्सीन घेण्यापासून जीवनशैलीत विविध प्रकारचे बदल सुद्धा करत आहेत, जेणेकरून कोरोनाची शक्यता कमी करता येऊ शकते. तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की, चीनचे लोक कोरोनाला पराभूत करण्यासाठी गाईच्या दूधाचा आधार घेत आहेत.

शरीरात प्रोटीनची मात्रा वाढवण्यासाठी चीनचे सरकार तिथे लोकांना जास्तीत जास्त गाईचे दूध पिण्यास सांगत आहे. दावा केला जात आहे की, प्रोटीन इम्यून सिस्टमला मजबूत करते. मागच्या वर्षी कोरोना पसरल्यानंतर संसदेच्या वार्षिक बैठकीत तेथील कायदा निर्मात्यांनी सरकारला दूध पिण्यावर एक कायदा बनवण्याचा सल्ला दिला. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला दरदिवशी किमान 300 ग्रॅम दूध पिण्याचा सल्ला देण्यात आला होता.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, शांघायच्या हुआशान हॉस्पिटलमध्ये संसर्गजन्य रोग विभागाचे प्रसिद्ध डॉक्टर झांग वेनहोंग यांनी संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात चीनमधील पालकांना एक विशेष सल्ला दिला होता. डॉक्टर वेनहोंग यांनी म्हटले होते की, आई-वडीलांनी दररोज सकाळी मुलांना दूध आणि अंडी देणे सुरू केले पाहिजे. ब्रेकफास्टमध्ये पोर्रिज देणे एकदम बंद करावे.

चीनच्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दूध पिण्याच्या या सक्तीवरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. चीनमध्ये बहुतांश लोक ब्रेकफास्टमध्ये बन आणि पोर्रिज (एक प्रकारचे दलिया) खातात. लोकांचे म्हणणे आहे की, आपला पारंपारिक नाश्ता सोडून दूध आणि टोस्ट खाणे योग्य आहे का.

चीनचे काही लोक तिथे पारंपारिक आहार आणि दूधातून मिळणार्‍या पोषणाची तुलना करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, चीनच्या पारंपारिक आहारात अ‍ॅनिमल प्रोटीन जास्त असते. टीकाकारांचे म्हणणे आहे की, आहारात कोणत्याही प्रकारचा बदल कोरोना व्हायरस होण्यापासून वाचवू शकत नाही आणि आहारात प्रोटीनचा समावेशी करण्याच्या इतरही अनेक पद्धती आहेत.

तर चीन सरकारने 2025 पर्यंत 450 लाख टन दूधाच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. जे आतापर्यंतच्या उत्पादनापेक्षा 30 पट जास्त आहे. चीनमध्ये गाईंची देखभाल आणि त्यांच्या खाण्या-पिण्यावर सुद्धा आता विशेष लक्ष दिले जात आहे. मात्र, चीनचे अनेक पशु कल्याण गट अनेक अभ्यासांचा संदर्भ देत यावर आक्षेप नोंदवत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, गाईचे दूध प्यायल्याने कॅन्सर, डायबिटीज आणि हृदयाशी संबंधीत आजार होऊ शकतात.