Coronavirus : चीनच्या एका निर्णयामुळं ‘करोना’पासून वाचले लाखो लोक, जगभरातून होतंय ‘कौतुक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून सुरू झालेला कोरोना व्हायरसचा प्रकोप आता 120 पेक्षा जास्त देशांत पसरला आहे. भारतात सुद्धा आतापर्यंत 84 रूग्ण सापडले आहेत. परंतु, ज्या देशातून या भयंकर व्हायरसची सुरूवात झाली, तेथे आता वेगाने परिस्थिती सुधारत आहे. एवढेच नव्हे, तर येथील तात्पुरती हॉस्पिटलही बंद करण्यात आली आहेत.

एका अंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार चीनच्या एका निर्णयाने या व्हायरसला लाखो लोकांमध्ये पसरण्यापासून रोखले आहे. यामुळे अंतरराष्ट्रीय स्तरावर चीनचे कौतूक होत आहे. अभ्यासानुसार चीनने कोरोनामुळे सर्वात प्रभावी वुहान शहर पूर्णपणे बंद करणे आणि राष्ट्रीय आपत्ती घोषित केली होती.

यामुळे हा व्हायरस अन्य भागात तीन दिवस उशीराने पोहचला आणि शहराच्या बाहेर फेब्रुवारीच्या मध्यपर्यंत 7.44 लाख लोकांना या व्हायरसपासून वाचवण्यात आले.

तीन देशांच्या 22 वैज्ञानिकांनी केला अभ्यास

वुहानमध्ये जाण्या-येण्यावर बंदी घातल्याने चीनमध्ये 2 लाख 2 हजार रूग्ण कमी झाले. चीनच्या या निर्णयामुळे प्रशासनाला या भयंकर व्हायरसशी लढण्यासाठी वेळ मिळाला. चीन, अमेरिका आणि ब्रिटनच्या 15 संस्थांच्या 22 शास्त्रज्ञांनी मिळून यावर अभ्यास केला आहे. हा अभ्यास आरोग्य विज्ञानच्या सर्व्हर मेडरिक्सिव्हमध्ये समाविष्ट आहे. परंतु, अजून तो प्रकाशित झालेला नाही.

5 करोड लोक घरात बंद

चीनने कोरोना व्हायरस पसरताच खुप कडक पावले उचलली. हुबेई प्रांत आणि त्याची राजधानी वुहान पूर्णपणे बंद करण्यात आले. 23 जानेवारीपासून येथे 5 करोड लोक आपल्या घरांमध्ये कैद आहेत. जागतिक आरोग्य संघटनेसह अंतरराष्ट्रीय समुदायात या निर्णयाचे कौतूक करण्यात आले आहे.

अनेक डॉक्टरांना आधीच जाणवले

कोरोना व्हायरसचा पहिला रूग्ण मागच्या वर्षी 17 नोव्हेंबरला समोर आला. तत्पूर्वी वुहानच्या डॉक्टरांना एका नव्या व्हायरसचा अंदाज आला होता. सर्वात आधी सूचना देणारे 29 वर्षीय डॉक्टर ली वेनलियांग यांचा आवाज दाबण्यात आला. नंतर त्यांचाच कोरोनामुळे मृत्यू झाला.

चीनमध्ये आतापर्यंत 3000 पेक्षा जास्त मृत्यू

चीनमध्ये शनिवारी कोरोना व्हायरसमुळे 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर या देशात मृत्यूंची एकुण संख्या वाढून 3189 वर पोहचली आहे. वुहानमध्ये आता मृत्यूची प्रकरणे हळुहळु कमी होत आहेत. शुक्रवारपर्यंत येथे 80,824 लोकांना संसर्ग झालेला होता.

सुरूवातीच्या 50 दिवसांचा अभ्यास

अभ्यासात 19 डिसेंबर ते 19 फेब्रुवारीदरम्यानच्या 50 दिवसातील व्हायरसच्या प्रभावाचा अभ्यास करण्यात आला आहे. वुहान 23 जानेवारीपासून अजूनपर्यंत पूर्णपणे बंद आहे. एका अंदाजानुसार वुहानमधून 43 लाख लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये अनेक भारतीय विद्याथीसुद्धा होते.