Coronavirus : संपुर्ण जग ‘लॉकडाऊन’, चीनमध्ये कारखाने सुरू, पुर्वपदावर येतंय जीवन

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  पुर्ण जगात 20 टक्के लॉकडाऊन आहे. सर्व लोक घरात बंद आहेत. बाजार बंद आहे. सरकारी कार्यालये बंद आहे. रहदारीची साधने बंद केली गेली आहे. ज्या देशातून कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास सुरुवात झाली तेथे आता सामान्य परिस्थिती झाली आहे. आता चीनचे जीवन पुन्हा रुळावर आले आहे. हुबेई प्रांतात लोक बाहेर पडत आहेत.

चीनमधील लोकांनी काम करण्यास सुरवात केली आहे. पुर्ण जग लॉकडाऊन झाल्यानंतर आता चीनमध्ये दोन महिन्यांनंतर सामान्य परिस्थिती असल्याचे आढळले आहे. लोक आपली घरे सोडून रस्त्यावर, बाजारपेठांमध्ये, मॉल्समध्ये, रुग्णालयामध्ये जात आहेत.

हुबेई मधील रहदारीवरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. यामुळे तेथील लोकसंख्येमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. लोक आता ट्रेन व बसची तिकिटे काढून आपल्या लोकांना भेटायला जात आहेत.

कार्यालये उघडली आहेत. कारखाने उघडले आहेत. कोरोनाशी लढायला मदत करण्यासाठी लोकांनी मास्क, जिपर बॅग आणि इतर गोष्टी बनवण्यास सुरुवात केली आहे. लोक मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी बाहेर पडत आहेत.

मंगळवारी चीनमध्ये एकूण 47 कोरोनाची नोंद झाली. हे असे लोक आहेत जे कुठेतरी अडकले होते आणि आता ते आपल्या देशात परत येत आहेत. मागील आठवड्यात ही संख्या 78 होती, जी आता कमी झाली आहे.

वुहान शहरातील लॉकडाऊन 8 एप्रिल रोजी समाप्त होईल. यावेळी, कोरोनाच्या त्या प्रकरणांवर चीन सरकार लक्ष केंद्रित करीत आहे जे इतर देशांमधून चीनमध्ये पोहोचत आहेत. कारण आता चीनमध्ये कोरोनाची कोणतीही स्थानिक प्रकरणे आढळली नाहीत.

लोक आता रेस्टॉरंट्समध्ये येऊ लागले आहेत. बर्‍याच रेस्टॉरंट्स ऑफर चालू आहेत, संपूर्ण चीनमध्ये अजूनही लोक फेस मास्कचा वापर करत आहे. जे लोक आपल्या कामावर परत आले आहेत त्यांना सरकारने कोरोनाशी संबंधित नियम पाळायला सांगितले आहेत. जेणेकरून पुन्हा ही समस्या उद्भवणार नाही. ऑफिस, फॅक्टरीमध्ये जाणाऱ्या लोकांची रोज 30 मिनिटे तपासणी केली जात आहे.