Coronavirus : ‘कोरोना’च्या विरूध्द चीननं उचललं मोठं पाऊल, आतापर्यंत कोणत्याही देशाला जमलं नाही करायला

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –  चीन ने दावा केला आहे की शुक्रवारी वुहानमध्ये 14.7 लाख कोरोना विषाणू चाचण्या घेण्यात आल्या. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. त्याचबरोबर गुरुवारी 10 लाख लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत इतर कोणत्याही देशातील एखाद्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात चाचण्या घेतल्याची माहिती समोर आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी चीनने वुहानच्या संपूर्ण लोकसंख्येची कोरोना चाचणी घेण्याचे ठरविले होते. चिनी अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते की 2 आठवड्यांत पूर्ण वुहानच्या 1.1 कोटी लोकसंख्येची चाचणी घेण्यात येईल. चीनने वुहानमध्ये एका दिवसात 14.7 लाख लोकांची न्यूक्लिक अ‍ॅसिड तपासणी केली. 8 एप्रिल रोजी वुहान येथे लॉकडाउन हटविले गेले. यानंतर 9-10 मे रोजी कोरोनाचे नवीन प्रकरणे समोर येण्यास सुरुवात झाली.

लॉकडाउन काढून टाकल्यानंतर कोरोनाची प्रकरणे उघडकीस आली तेव्हा चीनने 14 मे पासून वुहानमध्ये ज्या लोकांना कोरोनाची लक्षणे नव्हती त्यांची चाचणी करण्यास सुरुवात केली. वुहानपासूनच कोरोना विषाणूचे संक्रमण सुरू झाले आणि कोरोनाचा संसर्ग जगभरात पसरला.

चीनच्या अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात एकूण 84 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4600 लोक मरण पावले आहेत. वुहानमध्ये आता परिस्थिती चांगली असल्याचे चीनचे म्हणणे आहे. त्याच वेळी, जगात कोरोना विषाणूची 53,11,089 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. आतापर्यंत 3,42,104 लोकांचा मृत्यू या विषाणूमुळे झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like