Corona Virus : सर्वप्रथम ‘इशारा’ देणाऱ्या ‘डॉक्टर’ला चीनमध्ये मिळाली ‘मृत्यू’ची शिक्षा

बिजिंग : वृत्त संस्था – चीनमधून सुरू झालेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने भारतासह दोन डझन देशांना वेठीस धरले आहे. एकट्या चीनमध्ये आतापर्यंत 400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे 21 हजार लोकांना याची लागण झाली आहे. भारतासह अन्य देशांमध्ये सुद्धा या व्हायरसने शिरकाव केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यासाठी जागतिक आपत्ती घोषित जाहीर केली आहे.

अनेक देशात चीनवरून येणार्‍या – जाणार्‍यांचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. परंतु, ही महामारी अचानक संपूर्ण जगात पसरलेली नाही. खरंतर चीनमधीलच एका डॉक्टरने सर्वप्रथम आपल्या सरकारला कोरोना व्हायरसची सूचना देऊन धोक्याचा इशारा दिला होता. परंतु, त्याचा आवाज जगापर्यंत पोहचण्यापूर्वीच बंद करण्यात आला. या डॉक्टरचे नाव होते ली वेनलियांग.

30 डिसेंबरला आजाराबाबत दिली होती सूचना

डॉ. ली वेनलियांग यांनी मागच्या वर्षी 30 डिसेंबरला याबात सरकारला सावध केले होते. ज्या मेडिकल कॉलेजमध्ये ते शिकवत होते, त्या कॉलेजच्या ऑनलाइन अ‍ॅल्युमनी चॅट ग्रुप वुईचॅट वर सांगितले होते की, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये स्थानिक मच्छी मार्केटमूधन सात रूग्ण आले आहेत, ज्यांच्यामध्ये सार्ससारख्या आजाराचे लक्षण दिसून आले आहे. आणि त्यांना हॉस्पिटलच्या आयसोलेशन वार्डमध्ये ठेवले आहे.

2003 मध्ये सुद्धा सरकारने लपवला होता आजार

ली यांनी सांगितले की, तपासानंतर समजले की, हा आजार कोरोना व्हायरस आहे, जो व्हायरसचा एक मोठा गट आहे. 2003 मध्ये सुद्धा या व्हायरसने शेकडो लोकांचा जीव घेतला होता. चीनमध्ये या व्हायरसचे मुळ खुप जुने आहे. डॉक्टर ली यांनी म्हटले, मी माझ्या विद्यापीठातील सहकार्‍यांना याबाबत सावध करणार होतो.

व्हायरल स्क्रीनशॉट बनला संकटाचे कारण

34 वर्षांचे ली हे कोरोना व्हायरसने सर्वात जास्त प्रभावित चीनच्या वुहानमध्ये प्रॅक्टिस करतात. ली यांनी आपल्या सहकार्‍यांना सांगितले होते की, त्यांनी आपल्या कुटुंबियांना गुप्त पद्धतीने सावध करावे. परंतु, त्यांचा स्क्रीनशॉट काही वेळातच व्हायरल झाला. यानंतर ली यांना समजले की त्यांच्यावर आता संकट येऊ शकते.

वुहानच्या आरोग्य प्रशासनाने त्यांना नोटीस पाठवून विचारले की, तुम्हाला याबाबत कसे समजले. यानंतर एक दिवसानंतरच प्रशासनाने घोषणा केली. परंतु, ली यांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत.

अफवा पसरवण्याचा आरोप

डॉक्टर ली यांनी तो मेसेज पाठवल्यानंतर काही वेळानंतच पोलिसांनी त्यांच्यावर अफवा पसरवण्याचा आरोप केला. परंतु, असेही नव्हते की आवाज उठवणारे ते एकटेच होते. पोलीसांनी सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांना निशाण्यावर घेतले. सरकारकडून नोटीस आली की कुणीही आजार आणि त्याच्या आजाराबाबतची माहिती लीक करणार नाही. डॉक्टर ली यांच्याकडून असे पुन्हा करणार नाही, असे लेखी लिहून घेतल्यानंतर सोडण्यात आले.

आता याच डॉक्टरला झाली कोरोना व्हायरसची लागण

यानंतर चीनमध्ये सुमारे 21 हजार लोकांना या रोगाची लागण झाली आहे. दुखाची गोष्ट म्हणजे या आजाराची सर्वप्रथम माहिती देणार्‍या डॉक्टरचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. त्यांनी स्वता एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. 10 जानेवारीला रूग्णालयात रूग्णांवर उपचार करताना त्यांनाही खोकला आणि तापाचा त्रास सुरू झाला. 12 जानेवारीपासून ते रूग्णालयातील आयसीयूमध्ये आहेत. 1 फेब्रुवारीला त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निदाण झाले.