‘कोरोना’नंतर देखील चीनी लोकांमध्ये सुधारणा नाहीच ! सेक्स ‘पावर’ वाढविण्यासाठी जिवंत ‘बेडूक’ खाल्लं युवकानं, व्हिडीओ ‘व्हायरल’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात ७५ ,१९६ लोकांना संसर्ग झाला असून यापैकी ७४,१८५ लोक फक्त चीनमध्ये आहेत. या प्राणघातक विषाणूमुळे एकूण २००९ लोकांचा मृत्यू झाला यातील चीनचा आकडा २००४ इतका आहे. मात्र, असे असूनही चीनमधील लोक त्यांचे कृत्य अजूनही थांबत नाहीत. असच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक चीनी नागरिक बाजारात जिवंत बेडूक उघडपणे खाताना दिसत आहे.

कोरोनाव्हायरसच्या प्रसाराचे कारण अद्याप समजू शकले नाही. हा वटवाघुळापासून पसरला, सापापासून पसरला कि इतर कोणत्या प्राण्यापासून पसरला याचा अद्यापही खुलासा झालेला नाही. मात्र, हे एखाद्या प्राण्याद्वारे पसरलेले असल्याची पुष्टी केली जाते. दरम्यान, एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात बाजारातील एक माणूस जिवंत बेडकाला पकडून त्याला खात आहे. पहिल्यांदा त्याने दाताने बेडकाचे डोके चावून वेगळे केले आणि त्यांनतर त्याचा मेंदू बाहेर काढून खाल्ला.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे आरोग्य तज्ञ यानझॉंग हुआंग यांनी सांगितले की, चीनमध्ये जे जिवंत आहे ते खाण्याची परंपरा आहे. तिथे असे मानले जाते कि, बेडूक खाण्यामुळे पुरुषांची लैंगिक शक्ती वाढते. म्हणूनच लोक बेडूक खातात. चीनमध्ये असे प्राणी सहसा बाजारातून खरेदी करता येतात. यानझॉंग हुआंग यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची तपासणी केली तेव्हा आढळली की, हा व्हिडिओ २०१६ चा आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर हजारो कमेंट्स येत आहेत. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने भाष्य केले कि, चीनमध्ये कोरोना विषाणूचा यामुळेच पसरला आहे, कारण हा किती वाईट पद्धतीने बेडूक खात आहे. चीनमधील बर्‍याच शहरांमध्ये जनावरांची बाजारपेठ आहे. ज्याला वेट बाजार असे म्हणतात. येथे 120 पेक्षा जास्त प्रकारचे जिवंत प्राणी मिळतात. लोक त्यांना खायला घेऊन जातात. यापैकी कोणत्याही जीवातून कोरोना विषाणूचा प्रसार होतो.