Coronavirus : कलम 144 चा परिणाम होत नसल्यानं सरकार आणखी ‘कठोर’ निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांच्या उपस्थितीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक झाली.

राज्यात कलम 144 लागू केल्यानंतर याचे अनेक ठिकाणी उल्लंघन होत आहे. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आता सरकार आणि प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. सरकारच्या कायद्याच उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आज सरकारकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणखी काय उपाय योजना जाहीर केले जातात क, हे पहावे लागणार आहे.

राज्यात 144 लागू होणार ?
कलम 144 लागू करून संचारबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतरही राज्यातील रस्त्यावरील गर्दी कमी होत नाही. त्यामुळे राज्यात आता थेट संचारबंदी करण्यात येऊ शकते. अशा स्थितीत महत्त्वाचं काम सोडून नागरिकांना रस्त्यावर फिरता येणार नाही. संचारबंदीबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मागणी केली आहे. मात्र, अद्याप सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.