Video : मुख्यमंत्र्यांचं जनतेशी Facebook Live व्दारे संबोधन म्हणजे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 13) रात्री जनतेला संबोधित करताना 15 दिवसांच्या कठोर निर्बंधाची घोषणा केली आहे. तसेच या काळात सर्वसामान्यांसाठी मदतीचीही घोषणा केली आहे. दरम्यान जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचे सांगत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री महोदयांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे नेहमीप्रमाणे कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही या थाटाचे होते. मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मदत मागण्यासाठी कोणाची वाट पाहत होते, असा सवालही त्यांननी उपस्थित केला आहे.

 

 

 

 

 

आमदार भातखळकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी केलेली मदत अपुरी आहे. मध्यमवर्ग, दुकानदार, केशकर्तनालय, बारा बलुतेदार असे कित्येक लोक मदतीपासून वंचित राहणार आहेत. यांचा विचार कोणी करायचा. मुळात ज्यांना मदत दिली ती देखील अपुरी आहे. इतरांना तर साफ वाऱ्यावर सोडले आहे. त्यांना मदत का मिळाली नाही ? की मनात येईल ते बोलायचे अन् मनाला वाटेल तसे करायचे हा सगळा सावळा गोंधळ सुरु असल्याचे ते म्हणाले. दरम्यान काल रात्री राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी कठोर निर्बंधांची घोषणा केली. या काळात अत्यावश्यक सेवा तसेच सार्वजनिक वाहतूक मात्र सुरू राहील. कोरोनावरील उपाययोजना आणि लॉकडाऊनचा फटका बसणार असलेल्यांना मदत या पोटी 5476 कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.