सरकारची घोषणा म्हणजे मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार – भाजप आ. अतुल भातखळकर

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची संकट अधिक गडद होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसाची संचारबंदीची घोषणा केली. यावेळी गोर गरिबांना दिलासा देण्यासाठी मदतीची घोषणाही केली. मात्र, सरकारकडून करण्यात आलेली मदतीची घोषणा मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. ही मदत तुटपुंजी असल्याचे मत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर व्यक्त केले आहे.

आमदार भातखळकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह केले याही वेळी कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही’ या थाटाचे होते. परिस्थिती इतकी गंभीर असताना पंतप्रधानांकडे मदत मगण्यासाठी मुख्यमंत्री कोणाची वाट पाहत होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

 

 

 

 

मध्यमवर्ग, दुकानदार, केशकर्तनालय, बारा बलुतेदार असे अनेक लोक मदतीपासून वंचित आहेत. यांचा विचार कोणी करायचा ज्यांना मदत केली तीही अपुरीच इतरांना तर वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्या मदतीविषयी कोण बोलणार ? मनाला वाटेल ते करायचे, बोलायचे नुसता सावळा गोंध सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

 

 

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री जनतेशी संवाद साधत बुधवारी ८ पासून संचारबंदीचे कलम १४४ लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले. हा जनताकर्फ्यू असेल, तो जनतेच्या सहकार्याशिवाय यशस्वी होणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या काळात अत्यावश्यक सेवा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे फटका बसणारया लोकांसाठी मदतीची घोषणा करत ५ हजार ४७६ कोटीचे पॅकेज जाहीर केले. ऑक्सिजनची राज्यात कमतरता भासत आहे वेळप्रसंगी ऑक्सिजन आणण्यासाठी लष्कराची मदत मागणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.