‘या’ कंपनीत काम करणार्‍या 7000 जणांचं ‘नशीब’ फळफळलं, ‘कोरोना’च्या संकटातही 8 % पगारवाढ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात कोरोनाचा हाहाकार सुुरु असून सर्वच कंपन्यांची आर्थिक स्थिती ढेपाळली आहे. शितपेय बनवणार्‍या कोका कोला या जगप्रिसिद्ध कंपनीची भारतातील ‘हिंदुस्तान कोका कोला ब्रेवरेजेस’ने (एचसीसीबी) सात हजार कर्मचार्‍यांना 7 ते 8 टक्के पगारवाढ देण्याची घोषणा केली आहे. एक एप्रिलपासून ही पगार वाढ लागू होणार आहे.

कोरोनामुळे इतर कंपनीतील कर्मचार्‍यांना पगारकपात होणार असल्याचे सांगितले जात असतानाच दुसरीकडे एचसीसीबीने पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी काम करणार्‍या कंपनीच्या सर्व कर्चमार्‍यांना मागील वर्षीच्या कामाच्या आधारावर पगारवाढ देण्यात आली आहे, एचबीबीसीच्या भारतामध्ये एकूण 15 ठिकाणी कारखाने आहेत. ज्यामध्ये कोका कोला, स्पाइट आणि थम्सअपसारखी शितपेय बनवली जातात. त्याचप्रमाणे मिंटमेड आणि ‘माझा’ या शितपेयाचेही उत्पादन या कारखान्यांमध्ये घेतले जाते. कंपनीच्या प्रवक्तांनी 2019 च्या नियमांप्रमाणे कर्मचार्‍यांना पगारवाढ देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनामुळे काम थांबल्याचे कारण देत कंपनीने कोणत्याही कर्मचार्‍याला कामावरुन काढून टाकलेले नाही. त्याचप्रमाणे करोनामुळे आम्ही कोणत्याही प्रकारची कपात केलेली नाही, असेही प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. मागील आठवड्यांमध्ये कोका कोला कंपनीने भारतामधील काही कारखाने तात्पुरत्या स्वरुपात बंद केले आहेत.

सध्या केवळ पाण्याच्या पॅकेजिंगचे काम केले जात आहे. नुकतेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणांवरील कारखान्यांमध्ये काम पुन्हा सुरु झाले आहे. एचसीसीबीला 2018-19 मध्ये 9 हजार 455 कोटींची कमाई झाली. त्यापैकी 322 कोटी हा निव्वळ नफा आहे. कोका कोला भारतामध्ये प्रामुख्याने बाटली बंद शितपेय विकण्याच्या व्यवसायामध्ये. स्वत:च्या कारखान्यांबरोबरच फ्रॅन्चायझीच्या माध्यमातूनही कोका कोला भारतामध्ये शितपेय विकते.