‘कोरोना’वरील ज्या उपचारासाठी पाठ थोपटून घेतली ‘या’ मुख्यमंत्र्यांनी, त्याला ICMR नं फेटाळलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या उपचारात सध्या प्लाझ्मा थेरपी खूप प्रभावी असल्याचे सांगितले जात होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, कोरोना व्हायरस नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेनेही दिल्ली मॉडेल लागू केले आहे. केजरीवाल म्हणाले होते की, अमेरिकेने कोविड-१९ रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा अवलंब केला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, ते म्हणायचे की अमेरिका आज जे करतो, उद्या भारत करेल, पण आता दिल्लीचे अनुसरण अमेरिका करत आहे. मात्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत भारतात रूग्णांना दिल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरपीचा अभ्यास केला आहे, ज्याचे परिणाम निराशाजनक आहेत. अभ्यासानुसार, प्लाझ्मा थेरपी सौम्य ते गंभीर लक्षणे असलेल्या कोरोना विषाणू रुग्णांचा मृत्यू होण्याचा धोका कोणत्याही प्रकारे कमी करत नाही.

अभ्यासात असेही म्हटले आहे की, गंभीर प्रकरणांमध्ये प्लाझ्मा थेरपी दिल्यानंतरही मृत्यूचा धोका असतो. याव्यतिरिक्त ही थेरपी संसर्गही वाढण्यास रोखत नाही. अभ्यासासाठी प्लाझ्मा थेरपीच्या या चाचणीला प्लॅसिड ट्रायल असे नाव दिले गेले आहे. या अभ्यासाचे निकाल प्रीप्रिंट सर्व्हर मेड्रिक्सवर प्रकाशित केले गेले आहेत.

२२ एप्रिल ते १४ जुलै दरम्यान ३९ ठिकाणी प्लॅसिड ट्रायल केले गेले होते, ज्यामध्ये एकूण १२१० रूग्णांची तपासणी करण्यात आली. चाचणीमध्ये ज्या रुग्णांचा उपचार केवळ कोरोना विषाणूसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांनी केला जात होता, त्यांची तुलना औषधासह प्लाझ्मा थेरपीही दिल्या जाणाऱ्या रूग्णांशी केली गेली.

या चाचणीसाठी प्लाझ्मा देणारे अधिक पुरुष (९४.३%) होते, ज्यांचे सरासरी वय सुमारे ३४ वर्षे होते. हा प्लाझ्मा त्या डोनरकडून घेतला गेला होता, ज्यांना कोरोना विषाणूमधून बरे होऊन ४१ दिवस झाले होते. प्लाझ्मा थेरपी घेतलेल्या रुग्णांमध्ये सर्दी, मळमळ, चक्कर येणे आणि वेदना यासारखी किरकोळ लक्षणे दिसली. बहुतेक रूग्णांमध्ये ताप, हृदयाचे ठोके वाढणे यासारख्या तक्रारी आढळून आल्या.

या चाचणीत ७९ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी सापडल्याचे अभ्यासात म्हटले आहे. प्लाझ्मा थेरपीचा प्रभाव रुग्णाचे वय, रोगाची तीव्रता आणि प्लाझ्मा दात्याचे वय यावरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्यास प्रवृत्त केले जात आहे. बहुतेक डोनर कमी वयाचे आणि किरकोळ लक्षणे असणारेच येत आहेत.

अभ्यासात म्हटले गेले आहे की, कोरोनामधून बरे झालेल्या तरुणांच्या प्लाझ्मामुळे सौम्य किंवा गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांना फायदा होत नाही. प्लाझ्मा थेरपी ही एक प्रभावी उपचार म्हणून भारतासह अनेक देशांमध्ये पाहिली जात आहे. भारतात आपत्कालीन वापराअंतर्गत प्लाझ्मा थेरपी दिली जात आहे.

हा अभ्यास यासाठीही महत्त्वपूर्ण आहे, कारण आतापर्यंत असा दावा केला जात होता कि प्लाझ्मा थेरपीद्वारे कोरोना रूग्णांचे प्राण वाचू शकतात. भारतात सर्वप्रथम दिल्लीत प्लाझ्मा बँकेची सुरूवात झाली होती. महाराष्ट्रातही प्लाझ्मा बँकेची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

जोपर्यंत कोरोना विषाणूची लस येत नाही, तोपर्यंत आरोग्य तज्ञ आणि शास्त्रज्ञ प्रायोगिक उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपीकडे पहात आहेत. याला कोरोनावर प्रभावी उपचार म्हणू शकत नाही.