Coronavirus : मनुष्याच्या शरीरात लपण्यासाठी ‘व्हायरस’मध्ये होतोय वेळोवेळी बदल, ‘कोरोना’बाबत वैज्ञानिकांना चिंता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे अवघे जगच संकटात सापडलं आहे. यावरती नियंत्रण मिळविण्यासाठी सगळे देश धडपडत आहे. आरोग्य यंत्रणांसमोर मोठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषाणूवरती मात करू शकेल, अशी लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यावरती उपचार करण्यासाठी नवीन औषधांसासह वापरातील औषधांची देखील चाचणी सुरु आहे. परंतु, कोरोना संसर्गाच्या जीनोमविषयी जी माहिती मिळत आहे त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेसह सर्व एजन्सींना धक्का बसला आहे.

द गार्डियन ने दिलेल्या माहितीनुसार, जगातील ६२ देशात या विषाणूच्या ५,३०० जीनोमच्या विश्लेषणामुळे सर्वजणांना बुचकळ्यात टाकलं आहे. यातील स्पाइक (एस) प्रथिनेच्या संबंधित दोन मोठे बदल पाहिले गेले असून, यामधील एका बदलामुळे इटलीत विनाश झाला आहे. आता वैज्ञानिक सांगत आहे की, कोरोना संसर्ग मानवाच्या शरीरात लपून बसण्यासाठी वेगवेगळी युक्ती करत आहे. त्यासाठी तो स्वतःमध्ये सातत्याने बदल करत असल्याचं दिसून येत. त्यामुळे कोणत्याही लसीमुळे कोरोना संसर्गाच्या जीनोम अनुक्रमातील कोणत्याही बदलांचे बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं.

जगातील वैज्ञानिक लस तयार करण्यासाठी कोरोना संसर्गाच्या जीनोम क्रमांकवर नजर ठेवून आहे. त्यांची नजर एस प्रोटीनवर आहे. त्याच्या शक्तिशाली स्पाईकमुळे तो मानवाच्या शरीरात राहू शकतो. द गार्डियनच्या मतानुसार, २००२ मध्ये कोरोना संसर्ग कुटुंबामुळेच सार्स पसरला. मात्र त्याचे स्पाइक्स इतके शक्तिशाली नव्हते. वैज्ञानिकांना कोविड-१९ ची शक्ती दूर करायची आहे, त्यानंतर ते एक अगदी किरकोळ संसर्ग होईल. तसेच कोरोना संसर्ग हा प्रत्येक देशात परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करत असून आतापर्यंत भारतात कोरोना संसर्ग जीनोमध्ये एकूण ५२ अनुक्रम सापडली आहे. तर इतर देशांमध्ये त्याच्या जीनोम क्रमात हजारो छोटे छोटे बदल घडत आहे.

कोरोना संसर्ग हा २९,९०३ न्यूक्लियोडाईट्स किंवा न्यूक्लियस बेसपासून तयार झाला आहे. कोरोना संसर्गाच्या बाहेर फनेल सारखे सेन्सर आहेत. ज्याला स्पाइक (एस) प्रथिने म्हटलं जात. ही त्याची मूलभूत रचना असून, आपल्या आतमध्ये तो सातत्याने बदल घडवत असतो. थोडा विचार करा की, २९ हजार पेक्षा जास्त विटांनी एक घर बनवील गेलं आहे ज्याचा ढाचा बाहेरून एकसारखा असतो, मात्र आतमध्ये बदल करू शकतो. तसंच कोरोना संसर्ग आपल्या आतमध्ये सतत बदल करत असल्याचं वैज्ञानिकांना निदर्शनास आलं आहे. त्यालाच जीनोम अनुक्रम म्हणतात.