Coronavirus : ‘कोरोना’मुळं सर्वात कमी वयाच्या महिलेचा मृत्यू, ‘डिलेव्हरी’ झाल्यानंतर सोडले प्राण

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वृद्ध लोकांमध्ये या साथीने होणाऱ्या मृतांचा आकडा जास्त आहे. परंतु पोलंडमध्ये एका २७ वर्षीय निरोगी महिलेचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. मुलाला जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही महिला पूर्णपणे निरोगी होती. पोलंडमध्ये कोरोना विषाणूमुळे झालेला हा सहावा मृत्यू आहे, तर जगभरात कोरोना विषाणूमुळे कमी वयोमानात मृत्यू होण्याची ही पहिली घटना आहे.

अलीकडेच इटलीमधून परत आलेल्या तिच्या आईकडून या महिलेस कोरोना विषाणूची लागण झाली. सध्या इटली या जागतिक साथीचे केंद्र बनले आहे. पोलंड मधील माध्यमांच्या म्हणण्यानुसार या महिलेने काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिला होता आणि तिला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. यूकेमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे १४४ मृत्यू झाले आहेत आणि ३,००० हून अधिक संसर्गाची प्रकरणे आहेत.

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सरकार विविध मार्गांनी लोकांना जागरूक करत आहे आणि लोकांना सुरक्षित अंतर ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पोलंडचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी लोकांना १२ आठवडे लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगितले आहे. सरकार लवकरच येथे खबरदारी म्हणून आणखी काही धोरणे जाहीर करणार आहे.

हॅनकॉक म्हणाले, ‘सामाजिक अंतर ठेवणे खरोखर एक अवघड काम आहे, परंतु लोकांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ते करावे लागेल’. याशिवाय पोलंड सरकार मोबाईल मेसेजेस आणि पत्रांद्वारे जवळपास १४ लाख लोकांना संदेश पाठवून अलिप्त राहण्याचा सल्ला देईल. हे १४ लाख लोक असे आहेत ज्यांना आधीच आरोग्याशी संबंधित काही समस्या आहेत आणि त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. त्यापैकी बहुतेक लोक असे आहेत ज्यांना आधीच कर्करोग आहे, तसेच हृदय किंवा मूत्रपिंडाशी संबंधित आजार आहे.