Coronavirus : ‘कोरोना’मुळं ‘ग्रॅमी’ अवॉर्ड विनर ‘सिंगर’ जॉन प्राईनचं 73 व्या वर्षी निधन !

पोलीसनामा ऑनलाईन :ग्रॅमी विजेता अमेरिकन सिंगर जॉन प्राईन कोरोना व्हायरससोबतची लढाईन हरले आहेत. त्यांच वय 73 होतं. असं सांगितलं जात आहे की, कोरोनामुळं त्यांना न्युमोनिया झाला होता. जॉन प्राईन दीर्घकाळापासून आजारी होते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ते कोरोना पॉझिटीव असल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 13 दिवसांपासून ते आयसीयुमध्ये होते.

जॉन प्राईन यांच्यावर वंदेरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या फॅमिलीनं कंफर्म केली आहे. यानंतर अमेरिकन मीडिया कंपन्यांनी ही बामती शेअर केली आहे. प्राईन यांची पत्नी फियोना यांनी 20 मार्च 2020 रोजी शेअर केलेल्या इंस्टा पोस्टमध्ये खुलासा केला होता की तपासणीदरम्यान त्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. न्यूयॉर्क टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, प्राईनच्या कुटुंबाकडून अशी माहिती मिळाली आहे की, त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ज्यामुळं उपचारात कॉम्प्लिकेशन्स आले होते. ज्यामुळं त्यांना आपला जीव गमवावा लागला.

10 ऑक्टोबर 1946 रोजी शिकागोमध्ये जन्माला आलेले जॉन 14 व्या वर्षीच गिटार वाजवायला शिकले होते. यानंतर त्यांनी शाळेत लोकसंगीताचं शिक्षण घेतलं. ग्रॅज्यएट झाल्यानंतर त्यांनी यातच पाच वर्ष काम केलं. याच काळात ते गाणेही लिहू लागले. 1991 मध्ये जॉन प्राईन यांना कंटेम्पररी फोक अल्बम साठी ग्रॅमी अवॉर्ड मिळाला होता. याच कॅटेगरीत त्यांना 2005 मध्ये दुसरा ग्रॅमी अवॉर्ड मिळाला. 2019 साली त्यांना द रेकॉर्डिंग चा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्डही मिळाला होता.

प्राईन गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना फुप्फुसाचा कॅन्सर होता. डॉक्टरांनी आधीच त्यांच्या मानेची आणि फुप्फुसाची सर्जरी केली होती.