Coronavirus : ‘कोरोना’ लोकांना मारो किंवा न मारो परंतु ‘कंगाल’ नक्की करेल – शोएब अख्तर

पोलीसनामा ऑनलाईन :पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आपल्या वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत येत असतो. सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. जगभरात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर आता शोएब अख्तरनं भाष्य केलं आहे. बुधवारी त्यानं ट्विट केलं आहे. त्यानं म्हटलं आहे की, ही महमारी अनेकांना कंगाल करून सोडणार आहे.

बुधवारी ट्विट करत शोएब अख्तरनं कोरोनामुळं होणाऱ्या नुकसानीबद्दल आपले विचार मांडले. त्यानं या महामारीच्या परिणामावर बोलताना लिहलं की, या महमारीनं जेवढी लोकं मरणार नाहीत तेवढी कंगाल होतील. शोएब अख्तरचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट केल आहे. कमेंट करत नेटकरी आपापलं म्हणणं मांडताना दिसत आहेत.

लॉकडाऊन म्हणजे सुट्टी असं समजणाऱ्या लोकांनाही शोएबं झापलं आहे. व्हिडीओ शेअर करत त्यानं साऱ्यांचा समाचार घेतला होता जे लॉकडाऊन असूनही बाहेर फिरताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी त्यानं कुत्री, मांजर आणि वटवाघुळं खाण्यावरून चीनवर निशाणा साधला होता. खाण्यासाठी एवढं सारं आहे तरी तुम्ही हे असं सगळं कसं खावू शकता असं त्यानं म्हटलं होतं.