Coronavirus : ‘माशांमुळं ‘कोरोना’ पसरत नाही’, आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानं Big B अमिताभ तोंडघशी पडले !

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांना केंद्राच्या आरोग्य मंत्रालायनं चक्क खोटं ठरवलं आहे. कालच (बुधवार दि मार्च 2020 रोजी) एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यातील एका गोष्टीवरून आता आरोग्य मंत्रालयानं त्यांना खोटं ठरवलं आहे.

आजच(गुरुवार दि 26 मार्च 2020) आरोग्य मंत्रालयानं पत्रकार परिषद घेतली. आरोग्य विभागाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, “गेल्या 24 तासात देशात 42 नवीन कोरोनाग्रस्त समोर आले आहेत. चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा आकडा सध्या 649 झाला आहे. यापैकी 47 रुग्ण परदेशातून भारतात आले आहेत तर 606 रुग्ण हे भारतातील आहेत.”

यावेळी अग्रवाल यांना माशांमुळं कोरोना पसरतो असा अमिताभ बच्चन यांच्या व्हिडीओवरून प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी थेट नाही असं उत्तर दिलं. ते म्हणाले, “मी त्यांचं ट्विट पाहिलेलं नाही. परंतु एवढं जरूर सांगू शकतो की, माशांमुळं कोरोनाचं संक्रमण होत नाही.” असं ते म्हणाले.

काय म्हणाले होते बिग बी ?

बिग बींनी त्यांचा एक व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला होता. चीनमधील एका संशोधनाचा हवाला देत ते म्हणाले होते की, “अलीकडेच चीनच्या संशोधकांना असं आढळलं आहे की, कोरोना व्हायरस मानवी मलमूत्र किंवा विष्ठेवर अनेक आठवड्यांपर्यंत जिवंत राहू शकतो. कोरोनाचा रुग्ण पूर्णपणे नीट झाला तरी काही आठवडे त्याचं मलमूत्र किंवा विष्ठेवर कोरोना व्हायरस जिवंत राहू शकतो. जर अशा एखाद्या व्यक्तीच्या मलमूत्रावर एखादी माशी बसली आणि तीच माशी भाज्या, फळे किंवा अन्नावर बसली तर ही महामारी अजून पररू शकते.”

You might also like