Coronavirus : महाराष्ट्रात ‘कोरोना’चा हाहाकार ! राज्यातील 7 वा बळी, मुंबईत पालिका रूग्णालयात 40 वर्षीय महिलेचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळं 25 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 6 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. आज (रविवार) मुंबईतील महापालिकेच्या रूग्णालयात एका 40 वर्षीय महिलेचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांची राज्यातील संख्या 193 वर जाऊन पोहचली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे.

देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या 1000 वर जाऊन पोहचली आहे तर मृत्यूची संख्या 26 वर गेली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांकडून देखील कोरोनाच्या पार्श्वभुमीवर युध्दपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, सांगली जिल्हयातील इस्लामापूरमध्ये 3 दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा देखील बंद करण्यात आली आहे.