Coronavirus : कोरोनाबाधितानं मंत्र्यांसह शेकडो जणांना दिला ‘प्रसाद’, 30 जणांना लागण

चंदीगड : वृत्तसंस्था – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संक्रमणाचे प्रमाण अधिक आहे. अगदी लहान बालकांनासुद्धा संसर्ग झाल्याचे प्रकार समोर आले आहे. असे असले तरी काही जणांनकडून काेरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. किंबहूना होम क्वारंटाईन व्यक्तीही खुलेआमपणे शहरात, परिसरात वावरत असताना आढळल्या आहेत. पंजाबमधील संगरून Sangrun येथेही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. येथील एका कोरोनाबाधित व्यक्तीने गुरुद्वारामध्ये शेकडो जणांना प्रसादाचे वाटप केले. ही बाब ज्यावेळी समजली त्यावेळी तेथे गोंधळ उडाला. यावेळी तेथे उपस्थित असलेले पंजाबचे  शिक्षण मंत्री विजय सिंगला आणि संगरूरचे Sangrun माजी आमदार प्रकाशचंद गर्ग यांनीसुद्धा त्या कोरोनबाधिताकडून प्रसाद स्वीकारला. दरम्यान, शिक्षणमंत्र्यांनी गावात कोरोना तपासणी शिबीराचे आयोजन करण्यास सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.

ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे वागू शकत नाही इंटरनेट मीडिया : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

गुरुद्वारातील ग्रंथींनी ३१ मेला कोरोना तपासणी केली होती. त्यांचा अहवाल बाधित म्हणून आला. त्यानंतरही त्यांनी १ जूनला गुुरुद्वारात प्रसाद वाटल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. प्रसाद वाटपावेळी मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती. करमजित सिंग यांच्या निधनानंतर दिल्लीत आंदोलन करत असलेले शेतकरी इथे हजर राहिले होते. ग्रंथींच्या पत्नीचाही कोराेना अहवाल बाधित म्हणून आला आहे. घटनेनंतर गावातील लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३० जणांचा कोरोना अहवाल बाधित म्हणून आला आहे. या प्रसादवाटपावेळी गुरुद्वारामध्ये किती लोक उपस्थित होते, याची माहिती मिळू शकली नाही. पंजबामध्ये आढळून येत असलेल्या कोरोनारुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण ग्रामीण भागात आढळत आहे. शहरी भागांमध्ये मृत्यूदर तीन पट अधिक आहे.

 

READ ALSO THIS :

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत

भाडेकरूंसाठी खुशखबर ! 2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये घरमालक

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलने मोडले सर्व विक्रम, सतत होतेय महाग, जाणून घ्या आजचे दर