Coronavirus | दक्षिण अफ्रिकेवरून आलेल्या डोंबविलीकराच्या कुटुंबातील 7 जणांचा कोरोना रिपोर्ट आला समोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  दक्षिण आफ्रिकेवरुन (South Africa) आलेला एक प्रवासी कोरोना (Coronavirus) पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेतून 87 प्रवासी मुंबईत (Mumbai) आले आहेत. त्यापैकी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Corona report positive) आला आहे. हा प्रवासी डोंबिवली (Dombivli) येथील रहिवासी असून त्याचा कोरोना (Coronavirus) अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने त्याच्या कुटुंबातील सदस्यांची टेस्ट केली आहे.

 

दरम्यान दुसरीकडे दिलासादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या नातेवाईकांची करण्यात आलेल्या कोरोना टेस्टचा अहवाल आला आहे. कुटुंबातील सर्वाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
तसेच रुग्ण राहत असलेल्या इमारतीमधील इतरांची महापालिकेने टेस्ट घेण्यास सुरुवात केली आहे.
अशी माहिती केडीएमसीच्या (KDMC) आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील (Dr. Pratibha Panpatil) यांनी दिली.

 

डॉ. प्रतिभा यांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णाची तातडीने ओमिक्रॉनची (Omicron) चाचणी केली जाणार आहे.
तसेच या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी (Genome sequencing) पाठवले जाणार असून त्याला ओमिक्रॉनची लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.
सध्या या प्रवाशाला महापालिकेच्या रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे.
तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची उद्या तपासणी केली जाणार असल्याचे डॉ. पानपाटील यांनी सांगितले.

 

87 प्रवासी मुंबईत दाखल

 

दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत 87 जण आले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी दिली आहे.
या सर्वांचं ट्रेसिंग करण्याचे काम सुरु आहे. यातील डोंबिवलीमधील दोघे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
परंतु या दोघांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं आहेत की नाही याची टेस्ट अद्याप बाकी असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.

 

कोविड सेंटर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह

 

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आता सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोविड सेंटर (Covid Center) सज्ज आहेत ते पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करावे लागणार आहेत.
डॉक्टर, नर्स स्टाफ आपल्याकडे असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. विमानतळाबाबत (Airport) मुख्यमंत्री (CM) निर्णय घेतली.
बाहेर देशातून आलेल्या व्यक्तींची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि कुटुंबियांची चाचणी केली जाणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

 

Web Title : Coronavirus | corona report of dombivli patient family came from south africa report of all seven members negative mayor dr pratibha panpatil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pension Scheme SWP | करोडपती बनण्याचा हिट फॉर्म्युला ! 100 रुपये वाचवा आणि मिळवा 35,000 मासिक पेन्शन, येथे जाणून घ्या कॅलक्युलेशन

Gold Silver Price Today | महिन्याच्या अखेर सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Aurangabad Crime | धक्कादायक ! वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून 40 वर्षीय तलाठ्याची आत्महत्या; सुसाईड करण्यापुर्वी लिहिली चिठ्ठी