Coronavirus | कोरोनाचा कहर ! तीन मुख्यमंत्री, चार उपमुख्यमंत्री, सहा केंद्रीय मंत्र्यांसह 40 नेत्यांना संसर्ग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Coronavirus | कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वेगाने पसरू लागला आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच बाधितांची संख्या हजारोंच्यापुढे गेली आहे. संसदेतील या 718 कर्मचारी बाधित असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांनी वेग घेतला असून देशातील जवळपास 40 नेत्यांना कोरोनाचा संसर्ग (Corona Positive) झाल्याचे समोर आले आहे. गेल्या 10 दिवसांतील ही परिस्थिती असून यामध्ये तीन राज्यांचे मुख्यमंत्री, तीन राज्यांचे 4 उपमुख्यमंत्री आणि 6 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मंत्री (Minister of Maharashtra) आणि खासदारांना (MP) कोरोनाची लागण झाली आहे.

 

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) (दिल्ली), नितीश कुमार (Nitish Kumar) (बिहार), बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) (कर्नाटक) या मुख्यमंत्र्यांसह रेणू देवी (Renu Devi) (उपमुख्यमंत्री, बिहार), तारकिशोर प्रसाद (Tarkishore Prasad) (उपमुख्यमंत्री, बिहार), मनोहर आजगावकर (Manohar Ajagavkar) (उपमुख्यमंत्री, गोवा) दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) (उपमुख्यमंत्री, हरियाणा) यांना कोरोनाचा संसर्ग (Corona Positive) झाला आहे. (Coronavirus)

 

केंद्रीय मंत्रीही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.
त्यामध्ये नितीन गडकरी (Nitin Gadkari) (केंद्रीय रस्ते परिवहन, महामार्ग), राजनाथ सिंह (Rajnath Singh) (संरक्षण),
ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) (विमान वाहतूक), अजय भट्ट (Ajay Bhatt) (संरक्षण राज्यमंत्री),
महेंद्र नाथ पाण्डेय (Mahendra Nath Pandey) (अवजड उद्योग), भारती पवार (Bharati Pawar) (आरोग्य राज्यमंत्री),
अश्विनी चौबे (Ashwini Choubey) (सार्वजनिक वितरण राज्य मंत्री) यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील मंत्री आणि खासदार –
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), शिवसेना अरविंद सांवत (Arvind Sawant), राजन विचारे (Rajan Vichare),
नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat),
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad), महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर (Yashomati Thakur)
यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

 

बिहारचे मंत्री आणि नेते –
जेडीयू राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ लल्लन सिंह (Rajiv Ranjan alias Lallan Singh), माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी (Jeetan Ram Manjhi), कॅबिनेट मंत्री अशोक चौधरी (Ashok Chaudhary), सुनील कुमार (Sunil Kumar).

 

पश्चिम बंगालचे नेते –
टीएमसी नेता डेरेक ओ ब्रायन (Derek O’Brien), माजी केंद्रीय मंत्री व टीएमसी नेते बाबुल सुप्रियो (Babul Supriyo), टीएमसी प्रवक्ता कुणाल घोष (Kunal Ghosh). दरम्यान, गोविंद सिंह राजपूत (Govind Singh Rajput) (परिवहन, मध्य प्रदेश), टी. एस. देव सिंह, (T. S. Dev Singh) (आरोग्य, छत्तीसगड), राणा गुरजित सिंह (Rana Gurjit Singh) (पंजाब). समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव (Dimple Yadav) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

 

Web Title :-  Coronavirus | Coronas havoc Infection of 40 leaders including three Chief Ministers four Deputy Chief Ministers six Union Ministers

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा