‘कोरोना’बाधितासह 50 भारतीय शास्त्रज्ञ विमानातून मायदेशी परतले; मध्य आशियाई देशातील घटना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मध्य आशियातील(Central Asia) एका देशात अधिकृत दौऱ्यावर गेलेल्या 50 भारतीय शास्त्रज्ञांना हवाई दलाच्या सी-17 ग्लोबमास्टर या विशेष विमानाद्वारे मायदेशी परत आणण्यात आले (coronavirus-50-indian-scientists-home-events-central-asian-countries)आहे. यातील काही शास्त्रज्ञांना कोरोना संसर्गाची बाधा झाली आहे. मध्य आशियातील(Central Asia) त्या देशाचे नाव मात्र गुपीत ठेवण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या शास्त्रज्ञांचे पथक काही कामानिमित्त मध्य आशियातील एका देशात गेले होते. त्या देशाबरोबर भारताचा महत्त्वाच्या बाबींसंदर्भात एक करार झाला आहे. या पथकातील शास्त्रज्ञांपैकी काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती कळताच त्या देशातील भारतीय दूतावासाने केंद्र सरकारशी संपर्क साधला. या शास्त्रज्ञांच्या पथकातील कोरोना रुग्णांसह सर्वांना भारतात परत आणण्याची कामगिरी भारतीय हवाई दल पार पाडू शकेल का, अशी विचारणा केंद्र सरकारकडे करण्यात आली. त्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिसाद देत भारतीय हवाई दलाचे सी-17 ग्लोबमास्टर हे विमान संबंधित खात्यांची परवानगी घेऊन मध्य आशियातील देशात रवाना झाले आणि तेथून भारतीय शास्त्रज्ञांच्या फथकाला घेऊन मायदेशी परतले.

कोरोना रुग्णांना घेऊन येण्याची पहिलीच घटना

कोरोना साथीमुळे या आधी चीनच्या वुहान शहर व जगातील अन्य काही भागामध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागररिकांना हवाई दलाच्या विमानाने मायदेशात परत आणले होते. मात्र, त्यात एकही कोराेना रुग्ण नव्हता. त्यामुळे मध्य आशियातील देशातून भारतीय हवाई दलाच्या विमानाने कोरोना रुग्णांना घेऊन येण्याची प्रथमच पार पाडलेली ही मोहीम आगळीवेगळी ठरली आहे.